मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी मुंबईतील नामांकित रुग्णालयांपैकी एक असलेल्या कस्तुरबा रुग्णालयातील रस्ते मुंबई पालिकेने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे त्यांची दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याने या खराब रस्त्यांमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये या हेतूने हे रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता त्या प्रस्तावाला र-थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.
पालिका कस्तुरबा रुग्णालयात मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अनेकदा उपचारांसाठी किंवा काही कारणास्तव रुग्णांना एका इमारतीतून दुस-या इमारतीत हलवावे लागते. तसेच काही यंत्रसामुग्री किंवा शस्त्रक्रीयेशी संबंधित उपकरणे बाहेरून आणावी लागतात. त्यासाठी कस्तुरबा रुग्णालयामधील अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागतो. हे रस्ते खराब अवस्थेत असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते. हे लक्षात घेऊन रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला होता रस्त्यांचा कामांचा कार्यालयीन अंदाजित खर्च ४ कोटी ८८ लाख ३८ हजार ९८१ रुपये इतका आहे. कस्तुरबा रुग्मालयातील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणा आणि दुरूस्तीची कामे या कंत्राटात समाविष्ट केलेली आहेत. प्रस्तावात मे. ए. पी.आय. सिव्हीलकॉन प्रा. लि. या कंत्राटदाराची प्रशासनाने शिफारस केली आहे. या सर्व गोष्टीला पालिका र-थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे