मुंबई, दि. 29 - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल. तसेच कांदा निर्यात वाहतुकीसाठी दिली जाणारी पाच टक्के अनुदानाची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्याला मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्र शासनाला तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधान परिषदेत दिले.
नाशिक जिल्ह्यातील नगरसूल (ता.येवला) येथील शेतकऱ्याने दराअभावी कांद्याचे पीक पेटवून दिल्याच्या घटनेवर सदस्य जयंत जाधव यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला उत्तर देताना मंत्री देशमुख बोलत होते.
देशमुख म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकाला ताजा व स्वच्छ भाजीपाला उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना ठरविता यावा यासाठी राज्यात संत शिरोमणी सावतामाळी आठवडे बाजार 92 ठिकाणी सुरु करण्यात आला आहे.
यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारने यंदा दहा लाख मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे एक रुपया अनुदानाचे 43 कोटी लवकरच दिले जाणार आहेत. तसेच प्रवाशी रेल्वेला एक डबा शेतमालाचा जोडला जावा, अशा मागणीचा प्रस्ताव रेल्वे खात्याला पाठवला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हयात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने नाशिक जिल्हा हा मॉडेल जिल्हा म्हणून निवडला जाईल व या जिल्ह्याला कांदा हब बनविण्यात येईल. तसेच, यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व सदस्यांच्या सूचना मागवून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य नारायण राणे, हेमंत टकले, जयंत पाटील, रामहरी रुपनवर, अमरसिंह पंडित यांनी सहभाग घेतला.