मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण नौकेमुळे रोजगार व मत्स्य उत्पादनात वाढ होणार - महादेव जानकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण नौकेमुळे रोजगार व मत्स्य उत्पादनात वाढ होणार - महादेव जानकर

मुंबई, दि. 31 : मत्स्यप्रबोधिनी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र,रायगड-अलिबागच्या मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण नौकेमुळे सहा सागरी जिल्ह्यांमध्ये रोजगार व मत्स्य उत्पादनात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.


या नौकेचा जलावतरण कार्यक्रम आज गेट वे ऑफ इंडिया येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत पाटील, भरत गोगावले, विभागाचे सचिव आबासाहेब जराड, मत्स्यव्यवसाय आयुक्त दिलीप शिंदे यावेळी उपस्थित होते.

यावेळी जानकर म्हणाले की, सध्या सहा सागरी जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण केंद्र असून या केंद्रामध्ये सहा महिन्यांचे एक सत्र घेण्यात येते. प्रत्येक केंद्रामध्ये 22 प्रशिक्षणार्थी असतात. नौका नयनाचे नियम,किफायतशीर मासेमारी करावयाच्या पद्धती, मासळीची हाताळणी, मासळी पकडल्यानंतर ती सुरक्षित ठेवण्याच्या विविध पद्धती, डिझेल इंजिनाच्या विविध भागांची माहिती व इंजिन दुरुस्ती करणे, नौका चालविणे, फिश फाईंडर, वॉकी-टॉकी, जीपीएस व डॅट अशा अत्याधुनिक साधनांचा वापर करणे आदींचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पुढील वर्षाकरीता मोफत करण्याबाबत शासन विचाराधीन आहे, असेही जानकर यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad