रुग्ण व नातेवाईकांसाठी 'प्रवेश पास' पद्धती लागू करणार -
'विना प्रवेश' पास असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होणार -
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी वेगवेगळ्या रंगाचे प्रवेश पास असतील. रुग्णालय परिसरात असताना हे पास ठळकपणे दिसतील अशा पद्धतीने बाळगणे बंधनकारक असेल. तसेच ज्या व्यक्ती विना पास रुग्णालयात आढळून येतील त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शिव रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अशी माहिती दिली.
या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) सुनिल धामणे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, महापालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी यांच्यासह सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रवेशासाठी असणारी सर्व ठिकाणे (Entry Points) तातडीने निर्धारित करावीत. या ठिकाणांच्या संख्या लक्षात घेऊन डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक या नुसार प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार निश्चित करावे. याप्रमाणे निश्चित केलेल्या प्रवेशद्वारातूनच संबंधितांचे आवागमन व्हावे, यासाठी रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था अद्ययावत कराण्यात येणार आहे.
'महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी फोर्स' च्या सुरक्षारक्षकांना पोलिसांप्रमाणेच कारवाईचे व शस्त्र बाळगण्याचे अधिकार असतात यामुले सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने 'महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी फोर्स' द्वारे आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच आवश्यक तेथे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक देखील उपलब्ध करुन घेण्याचेही आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले.
रुग्णालयात दाखल होणा-या सर्व रुग्णांना एक 'प्रवेश पास' व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी दोन 'प्रवेश पास' देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. तसेच कोणत्याही परिस्थितीत दोन पेक्षा अधिक नातेवाईकांना प्रवेश दिला जाऊ नये, असेही आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये सीसीटिव्ही आहेत. या सीसीटिव्हींचे फूटेज नियमितपणे तपासून विनापास ज्या व्यक्ती दिसून येतील त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबंधित रुग्णांलयांचे अधिष्ठाता व सुरक्षा अधिकारी यांना देण्यात आले आहेत.