मुंबईवर होऊ शकतो मिसाईल अँटॅक - ड्रोन आदींवर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2017

मुंबईवर होऊ शकतो मिसाईल अँटॅक - ड्रोन आदींवर बंदी


मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन तसेच उत्तर प्रदेशात आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या खुरासाना या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला एन्काऊंटरमध्ये ठार मारल्यानंतर दहशतवादी संघटना मुंबईसारख्या शहरांवर हवाई हल्ला करू शकतात, अशा गुप्तचर संस्थेच्या इशार्‍यानंतर मुंबई पोलिसांनी आकाशात उडणारी रिमोट कंट्रोलवरील विमाने, खाजगी ड्रोन, एरिअल मिसाईल, पॅराशूट आदींवर बंदी घातली आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला दहशतवाद्यांकडून असलेल्या सततच्या धोक्यामुळे मुंबई पोलीस सदैव सतर्क असतात. गुप्तचर संस्थांच्या माहितीवरून मुंबई शहरावर हवाई हल्ला होण्याच्या शक्यतेने ड्रोन, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने विमानांचे उड्डान, एरिअल मिसाईल, पॅराशूट अथवा पॅराग्लायडिंगला एक महिन्यासाठी मुंबई पोलिसांनी बंदी घातली असून तसे आदेश पत्र प्रसारित केले आहेत. केवळ मुंबई पोलिसांच्या ड्रोनला परवानगी असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेने मुंबई पोलिसांकडून हा खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीच्या वेळेही असेच निर्बंध लागू करण्यात आले होते. ३१ मार्च ते २९ एप्रिल यादरम्यान शहरातील सर्व खाजगी कंपन्यांना ड्रोन, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने उडणारी विमाने, पॅराशूट अथवा पॅराग्लायडिंग करता येणार नाही. आकाशातील अशा प्रकारच्या हालचालींवर लक्ष देण्याचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. तसेच शहरातील उंच इमारतींवर देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याचे मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad