निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2017

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

मुंबई ( प्रतिनिधी ) – डॉक्टरांना मारहाण झाल्या प्रकरणी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता या निवासी डॉक्टरांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत रुग्णालयांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येत नाहीत. तसेच २०१० च्या व्हायोलेन्स अगेन्स्ट डॉक्टर्स या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर निवासी डॉक्टरांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आझाद मैदानात निदर्शनेही केली. आयसीओ, अतिदक्षता विभाग यांसारख्या ठिकाणी गंभीर जखमी रुग्णांना भरती केले जाते. त्यामुळे याठिकाणी सशस्त्र सुरक्षा रक्षक असावा, रुग्णालयात अलार्म सिस्टीम बसवावी, एका रुग्णासोबत केवळ दोनच नातेवाईकांना रुग्णालयात येण्याची परवानगी द्यावी इत्यादी मागण्या आम्ही केल्या होत्या. परंतु, अद्यापी या मागण्यांवर अंमलबजावणी झालेली नाही. आम्हाला नुसतीच अश्वासनेच दिली जातात. त्यावर अंमलबजावणी होत नाही असा आरोप डॉक्टरांनी केला. 

Post Bottom Ad