महापालिका रुग्णालयातील संप करी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करू - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2017

महापालिका रुग्णालयातील संप करी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करू - महापौर



मुंबई / प्रतिनिधी - धुळे येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणी नंतर मुंबई महापालिकेच्या शिव रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार घडल्याने निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आँदोलन सुरु केले आहे. हे रजा आँदोलन त्वरित मागे घेवुन डॉक्टर कामावर रुजू न झाल्यास नियमाप्रमाणे कारवाई करू असा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर यांनी दिला आहे.
शिव रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर त्यांच्या मागण्याबाबत सोमवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर, पालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, संचालक अविनाश सुपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्वरित सुरक्षा देण्याची मागणी केली. डॉक्टरांना काम करताना सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलिस द्यावेत, आलाराम लावावेत, पेशंट बरोबर वार्डमध्ये 2 नातेवाईक, इमरजंसी वार्डमध्ये 3 नातेवाईक येतील याची दक्षता घ्यावी. रुग्णाबरोबर मोठा घोळका येणार नाही यासाठी प्रशासनाने कारवाई करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. आता पर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने आम्ही सामुदायीक रजा घेतल्या आहेत. जो पर्यंत सुरक्षित वाटत नाही तो पर्यंत कामावर हजर होणार नसल्याची माहिती डॉ. नंदीश व शारन सोनवने यांनी दिली.

दरम्यान याबाबत बोलताना डॉक्टरांनी केलेल्या मागण्यापैकी रुग्णाबरोबर दोन पास व घोळका येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांशी बोलणे झाले असून शनिवार पर्यंत 400 व 1 एप्रिल पासून आणखी 300 असे एकूण 700 शस्त्रधारी पोलिस नियुक्त केले जाणार आहेत, दुप्पट खर्च करून हे पोलिस दिले जाणार आहेत असे महाडेश्वर यांनी सांगितले.

संपकरी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार का याबाबत बोलताना डॉक्टरांनी सामूहिक रजा मेस्मा असल्या तरी हा संपाचा प्रकार आहे. रुग्णांचे हाल होत आहेत याची दखल या डॉक्टरांनी घ्यायला हवी. रुग्णांचे हाल होऊ नए म्हणून डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा अन्यथा डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर महाडेश्वर यांनी दिला आहे.

Post Bottom Ad