"एल" प्रभाग समिती निवडणुकीत मनसेचे दिलीप लांडे बिनविरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2017

"एल" प्रभाग समिती निवडणुकीत मनसेचे दिलीप लांडे बिनविरोध

मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीत शिवसेना -मनसे युती झाली नसली तरी कुलाॅ एल वॉर्ड प्रभाग समितीमध्ये मात्र शिवसेनेने मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवार प्रवीणा मोडसकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे मनसेचे दिलीप (मामा) लांडे यांची प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध बुधवारी निवड झाली

एल वॉर्डमध्ये प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रवीणा मोडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सईदा खान व मनसेचे मामा लांडे यांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेकडे एकूण सहा जणांचा पाठिंबा होता. परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला दोन सदस्यांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र भाजपची मदत घेण्यापेक्षा शिवसेनेने थेट माघार घेऊन मनसेचे गटनेते दिलीप लांडेंना प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिले. यावेळी राष्ट्रवादीच्या सईदा खान यांनीही अर्ज मागे घेतल्याने फक्त तीन सदस्य असलेल्या लांडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपला धक्का देण्यासाठी संख्याबळ असूनही शिवसेनेने मनसेला मदत केल्याची चर्चा आहे. दरम्यान पहिलं वर्ष एल वॉर्डचे अध्यक्षपद मनसेकडे तर पुढील वर्षाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान महापालिका निवडणुकीत शिवसेना - मनसे युती झाली नसली तरी भाजपला रोखण्यासाठी एल वॉर्डप्रमाणे राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान 17 प्रभाग समित्यांपैकी 16 प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यांत 15 समित्यांवर शिवसेना, भाजपचे वर्चस्व राहिले आहे. एल वॉर्ड प्रभाग मात्र शिवसेनेच्या मदतीमुऴे मनसेकडे गेला आहे. आता शेवटची एम - पूर्व प्रभाग समिती निवडणूक येत्या 25 मार्चला होणार आहे.

हा खरा चमत्कार राज साहेबांमुळेच -
निवडून येण्यासाठी मला सर्वच पक्षांनी मदत केली. त्यामुळे सध्या एल वॉर्डचं प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेकडे आहे. पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू,” आजचा हा चमत्कार राज साहेबांच्या आशीर्वादाने झाला आहे. पुढील काळातही राजसाहेबांचे असेच चमत्कार बघायला मिळतील.
-दिलीप (मामा) लांडे

Post Bottom Ad