बहुमत नसलेल्या सरकारचे अभिभाषण असंवैधानिक - धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2017

बहुमत नसलेल्या सरकारचे अभिभाषण असंवैधानिक - धनंजय मुंडे


मुंबई दि.15 - राज्य सरकारला बहुमत आहे का नाही हेच सिध्द नाही सत्तेतील पक्षच सरकारवर अविश्वास व्यक्त करीत असल्याने बहुमत नसलेल्या या सरकारचे हे अभिभाषण असंविधानिक असल्याचे सांगत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणवरील चर्चा राखुन धरली.
विधान परिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चासाठी विशेष बैठक सकाळी बोलावण्यात आली होती. कामकाजाला सुरुवात होताच ना.धनंजय मुंडे यांनी या चर्चेवर जोरदार हरकत घेतली. बहुमत आहे का नाही हे सिध्द न झालेल्या सरकारचे अभिभाषण संवेधानिक कसे ठरु शकते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला त्यास माजी मुख्यमंत्री आ.नारायण राणे, आ.शरद रणपीसे, आ.हेमंत टकले यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृह सुरुवातीस अर्धा तास व त्यानंतर पुन्हा तहकुब झाले. शेवटी नियमित बैठकीत गोंधळात अभिभाषणवरील प्रस्ताव मंजुर करण्यात आला.

Post Bottom Ad