मुंबई, दि. 16 : बांधकाम क्षेत्रातील कामगारांची उत्पादन क्षमता व रोजगार क्षमता वाढविण्यासाठी संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांच्या कौशल्याचा शोध घेणे,कौशल्यवृध्दी करणे व प्रमाणित करणे तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभवातून कौशल्य धारण केलेल्या उमेदवारांच्या कौशल्याचे प्रमाणीकरण करणे यासाठी कौशल्य वृध्दीकरण योजना राबविण्याबाबत केंद्र शासनाने ‘Recognition of Prior learning (RPL) of construction workers’ या योजनेस मान्यता दिलेली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार,कल्याणकारी मंडळाच्या बैठकीमध्ये कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदित बांधकाम कामगारांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत मंडळाकडून मंजुरी देण्यात आली होती.
त्यानुसार आज कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार,कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार आयुक्त यशवंत केरुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण, पुणे,नाशिक, औरंगाबाद, नागपूर या 5 महसूल विभागांमध्ये प्रत्येकी एक (TP) Traning Provider यांची नियुक्तीबाबतचा सामंजस्य करार करण्यात येवून या योजनेची अंमलबजावणी त्वरित सुरु करण्यात येणार असल्याची संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना (बार बेंडीग,मासनरी, शटरींग कारपेंटरींग, प्लम्बिंग, पेटींग, स्कॅफोल्डींग) आदी विषयांवर मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणार्थी कामगारांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार पगारनुकसान भरपाई देण्यात असून प्रशिक्षणार्थी बांधकाम कामगारांना केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनोंदित बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये करण्यासाठी क्षेत्रीय कामगार विभागाशी संपर्क साधावा व मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.