बोगस अ‍ॅडमिशन घोटाळ््यात पालिका कर्मचाऱ्यासह तिघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

बोगस अ‍ॅडमिशन घोटाळ््यात पालिका कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

मुंबई - सर्व शिक्षा अभियानाच्या नावाखाली पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे बोगस अ‍ॅडमिशन करणाऱ्या टोळी पालिकेच्या कृपेने सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले. याप्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
सायन कोळीवाडा येथील सी.बी.एम शाळेत ६ पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळविला. यामध्ये बनावट जन्म दाखल्याचा समावेश आढळून आला. ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच शाळेच्या मुख्याध्यापिका रिबेका शिंदे यांनी अ‍ॅण्टॉपहील पोलीस ठाण्यात २१ मार्च रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अ‍ॅण्टॉपहील पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन सहा पालकांसह दोन दलालांना अटक केली. यामध्ये पाच महिला पालकांचा समावेश आहे. पालक इमरान सय्यद (४२), फरझाना (२९), मुमताज (३७),सयईन (४०), जरीना (३७), राबीया (२६) या पालकांसह दलाल कमरुद्दिन नईमुद्दिन शेख (३७), इनुस इस्माईल बाझा (४२) यांना अटक आरोपींची नावे आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या प्रकरणाचा अधिक तपास करताना पालिका कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली. तपास अधिकारी राजेंद्र सांगळे याच्या पथकाने याप्रकरणी पालिकेच्या एम/ईस्ट वॉर्डातील शिपाई रामदास जाधव याच्यासह शैलेश जानकर आणि दलाल प्रकाश कदमला बेड्या ठोकल्या आहेत. जानकर हा केईएम रुग्णालयातील जन्म दाखल्याची नोंदणी करतो. तो पालिकेचा आरोग्य विभागातील कर्मचारी आहे. कदमने बनावट जन्म दाखल्यासाठी जाधवशी संपर्क साधला. त्याला दोन हजार रुपये देण्याचे ठरले. जानकरला यामध्ये पाच हजार रुपये देण्यात आले. जानकरने डॉक्टरांना अंधारात ठेवत बोगस जन्म दाखला तयार केला. आणि जाधवला दिला. ही टोळी एका जन्म दाखल्यासाठी १० ते ५० हजार रुपये घेत असल्याचे उघड झाले आहे. 

Post Bottom Ad