मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या 'जी दक्षिण' विभागांतर्गत येणा-या 'वरळी कोळीवाडा' परिसरातील गोल्फादेवी मंदिराजवळ असणा-या सोनापूर गल्लीतील एका इमारतीतील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. त्याचबरोबर परळ परिसरातील गणपतराव कदम मार्ग आणि सेनापती बापट मार्गाच्या जंक्शन जवळील भूखंड क्रमांक 'परळ डिवीजन सीएस २/१५६' यावरील इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम देखील तोडण्यात आले आहे. पालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांच्या नेतृत्वात पालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
वरळी कोळीवाड्यातील गोल्फादेवी मंदिराजवळ गेल्या ३० वर्षांपासून असणा-या एका निवासी घरात व घरावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या मजल्याचा स्लॅब व भिंत आणि घराच्या दुस-या मजल्यावरील २ खोल्यांचा समावेश होता. हे सर्व अनधिकृत बांधकाम पालिकेच्या पथकाद्वारे नुकतेच तोडण्यात आले. यासाठी पालिकेचे २० कामगार – कर्मचारी - अधिकारी तसेच मुंबई पोलीस दलाचे ८ कर्मचारी कार्यरत होते. ही कारवाई सुरु असताना संबंधितांकडून पालिकेच्या पथकाला विरोध देखील झाला होता . तसेच परळ परिसरातील सेनापती बापट मार्ग व गणपतराव कदम मार्गाच्या जंक्शनवर असणा-या भूखंड क्रमांक 'परळ डिवीजन सीएस २/१५६' यावरील ४ मजली व्यवसायिक इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. यामध्ये या इमारतीच्या दुस-या व तिस-या मजल्यावरील छोट्या गच्चीचे रुपांतरण अनधिकृतपणे खोलीमध्ये करण्यात आले होते. तसेच चौथ्या मजल्यावर असणा-या मुख्य गच्चीवर देखील अनधिकृतपणे भिंती बांधून व त्यावर स्लॅब टाकून गच्चीचे रुपांतर मजल्यामध्ये करण्यात आले होते.पालिकेच्या जी / दक्षिण विभागाच्या पथकाद्वारे या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येऊन, ही सर्व अनधिकृत बांधकामे उध्वस्त करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी पालिकेचे २५ कामगार – कर्मचारी - अधिकारी कार्यरत होते. तसेच मुंबई पोलीस दलाचे ४ कर्मचारी कार्यरत होते.