महापालिका रुग्णालयांत पीएनजी गॅस प्रणाली - अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

महापालिका रुग्णालयांत पीएनजी गॅस प्रणाली - अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्वयंपाक, उष्णतेच्या कार्यासाठी व प्रयोग शाळेकरीता पीएनजी गॅस प्रणाली बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या आर्थिक वर्षापासून हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असून याकरिता सन २०१७ - १८ च्या अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.


पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत पर्यावरणस्नेही, किफायतशीर, सुरक्षित नॅचरल गॅस बसवण्याचे (पीएनजी) प्रस्तावण्यात आले आहे. केईएम, कस्तुरबा, कूपर, जीटीबी, नायर व नायर दंतवैद्यकीय रुग्णालय येथे मध्यवर्ती पाईप नेटवर्क सिस्टीम बसवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. आता कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे पीएनजी बसवण्याचा पालिकेचा मानस आहे. पश्चिम उपनगरांतील हे प्रमुख रुग्णालय असून येथे स्थानिक तसेच आसपासच्या झोपडपट्टीतील रुग्णास आरोग्यसेवा पुरवली जाते. या रुग्णालयात सध्या एलपीजी सिलींडर्स व विद्युत हॉटप्लेट वापरल्या जातात. महानगर गॅसच्या पाईप गॅस नेटवर्कमुळे सदर रुग्णालयास गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल. याधर्तीवर भगवती, भाभा यासारखी उपनगरीय रुग्णालये, प्रसुतीगृहे व केईएम, शीव रुग्णालयांतही ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाने अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad