नामनिर्देशित नगरसेवकांमध्ये कोणाची वर्णी ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 March 2017

नामनिर्देशित नगरसेवकांमध्ये कोणाची वर्णी ?



मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेत नामनिर्देशित नगरसेवकामध्ये शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव व् अरविंद भोसले तर भाजपकडून भालचंद्र शिरसाट, विनोद शेलार व् काँग्रेसकडून सुनील नरसाळे यांच्या नावाची चर्चा आहे. या नावांची 17 मार्चला पालिका सभागृहात घोषणा होण्याची शक्यता आहे.

पालिकेत 227 नगरसेवक आहेत. यामध्ये पाच नामनिर्देशित नगरसेवकांची निवड पक्षातर्फे केली जाते. यात शिवसेनेचे 2, भाजपचे 2 व कॉंग्रेसचा 1 नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव या माजी सभागृह नेत्या होत्या. त्यांचा महापालिका निवडणुकीत थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला. शिवसेनेत अनुभवी असल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या नावाबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपमधून भालचंद्र शिरसाठ, विनोद शेलार यांचे नाव आघाडीवर आहे. हे दोघेही अनुभवी नगरसेवक आहेत. या दोघांचा पालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. कॉंग्रेसमधुन सुनील नरसाळे यांना संधी मिळू शकते.

Post Bottom Ad