मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2017

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला



मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दरवर्षी फेब्रुवारीच्या तीन ते चार तारीखला जाहीर होणारा पालिकेचा अर्थसंकल्प, आता 29 मार्चला पालिका स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे. महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर, तो अंमलात आणण्याची तरतूद असल्याने 31 मार्चपूर्वी त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
पालिकेचा सन 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणे अपेक्षित होता. महापालिका आयुक्तांमार्फत हा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यांना सादर करण्यात येतो. यामध्ये त्या-त्या आर्थिक वर्षातील विकासकामे, नव्या योजना, कर आणि दरवाढ, तसेच इतर नागरी पायाभूत सेवा सुविधांचा समावेश असतो, परंतु यंदा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे, हा अर्थसंकल्प आत 29 मार्चला सादर केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात काय असणार आहे याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. रस्ते, शिक्षण, पाणी आदि मुलभूत सुविधांसाठी पालिका या अर्थसंकल्पात काय उपाय योजना केल्या आहेत ते 29 मार्चला कळणार आहेत. गेल्या वर्षी पालिकेने 37,500 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा पालिकेचा 40 हजार कोटींच्या आसपास अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अर्थसंकल्पात पालिकेकडून आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टला कोणत्याही प्रकारची मदत केली जाणार नाही. मात्र पाण्यावर करवाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात करवाढ केली जाणार कि मुंबईकरांना चांगल्या सोयी सुविधा देण्यावर भर देणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 

Post Bottom Ad