सुधारच्या अध्यक्षपदी अनंत नर, तर बेस्टच्या अध्यक्षपदी अनिल कोकीळ यांची बिनविरोध निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2017

सुधारच्या अध्यक्षपदी अनंत नर, तर बेस्टच्या अध्यक्षपदी अनिल कोकीळ यांची बिनविरोध निवड


मुंबई - मुंबई महापालिका सुधार समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनंत (बाळा) नर, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोकीळ यांची बिनविरोध निवड झाल्याची गुरुवारी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर घोषणा केली. नियुक्तीनंतर नर व कोकिळ यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्षपदासाठी नर व कोकीळ यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे फक्त औपचारिकता बाकी होती. गुरुवारी निवडणूकीच्या दिवशी नर व कोकीळ यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या विविध वैधानिक व इतर समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. अद्याप स्थायी समिती, शिक्षण समिती व गुरुवारी सुधार व बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. भाजपा निवडणूक लढवणार नसल्याने संख्याबळानुसार चारही समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्याच नगरसेवकांची वर्णी लागली आहे. उर्वरित स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार व उद्यान समिती, विधी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येत्या २0 मार्च रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून २३ व २४ मार्चला निवडणूक होणार आहे.

Post Bottom Ad