मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेतील सत्ता गमावणा-या भाजपाने पालिकेतील महापौर, र-थायी, शिक्षण सुधार , बेस्ट आधी विविध समित्यांच्या निवडणुकां लढवणार नसल्याची घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र भाजपाने आतापासूनच लगेच दुटप्पी भूमिका घेत निवडणुकीवरून युटर्न मारला आहे पारदर्शकतेचे पहारेकरीची भूमिका बजावणार असा निर्णय घेतलेल्या भाजपने अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिका निवडणुकीत शिवसेनेने 84 जागांवर तर भाजपने अगदी बरोबरीत 82 जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला 4 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या जागा 88 तर भाजपला एक अपक्ष व अभासेच्या गीता गवळी यांनी पाठींबा दिल्याने भाजपच्या जागा 84 झाल्या. त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेना -भाजपमध्ये जोरदार चुरस होती. मात्र भाजपने महापौर, उपमहापौर शिवाय कोणत्याही समित्यांची निवडणूक लढवणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ भाजपपेक्षा जास्त असल्याने पालिकेत शिवसेनेचाच महापौर झाला. महापौर निवडणूकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे सत्तेतही नाही व विरोधी पक्षाच्या खुर्चीतही नाही असे चित्र सध्या तरी बघायला मिळते आहे. पालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक न लढवण्याच्या घोषणेनंतर महत्वाच्या समित्या आणि पदे मिळण्याची संधी भाजप नगरसेवकांनी गमावली होती. यामुळे अनेक भाजप नगरसेवक नाराज होते. अखेर नगरसेवकांच्या दबावामुळे अखेर भाजपने प्रभाग समिती निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळ जास्त असलेल्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार आहे. मात्र, कुणाकडेही मदत मागणार नाही, आणि कुणालाही मदत देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचे बहुमत नाही त्या ठिकाणी सेनेचेही बहुमत नसेल तर सेना- भाजप एकमेकांना मदत करणार का हा प्रश्न आहे.
येत्या 17 मार्च पासून प्रभाग समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्यक्ष निवडणूक 21, 22 व 25 मार्च रोजी होईल.
प्रभाग समित्यांमधील राजकीय समीकरणे - एकूण 17 प्रभाग समित्या-
शक्यता - 1शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढल्यास सेनेला ४ तर भाजपला ५ ठिकाणी प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळेल
शक्यता -२ शिवसेना, भाजप स्वबळावर लढली आणि काँग्रेस, राष्टृवादी, मनसे हे तटस्थ राहिले किंवा त्यांनी वेगळा उमेदवार दिल्यास सेनेकडे 7 तर भाजपकडे 8 प्रभाग समित्या ताब्यात येतील.
शक्यता - 3शिवसेना आणि भाजपने एकत्र येवून निवडणुका लढवल्या तर 17 पैकी 16 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद दोन्ही पक्षांना मिळू शकते.