बेस्टने फायदा कमवावा हा पालिका आयुक्तांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे - सुनिल गणाचार्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

बेस्टने फायदा कमवावा हा पालिका आयुक्तांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे - सुनिल गणाचार्य

मुंबई / प्रतिनिधी - जगभरात कोणताही परिवहन उपक्रम फायद्यात चालत नाही. तरीही बेस्ट उपक्रमाने फायदा कमावला पाहिजे असा हट्ट मुंबई पालिका आयुक्त करत आहेत. पालिका आयुक्तांचा हा हट्ट बंद करावा, आयुक्तांचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे अशी मागणी बेस्टमधील भाजपा सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. बेस्टने पालिकेकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. बेस्टला मदत करावी म्हणून पालिका अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढन्यासाठी स्थायी समिती व पालिका सभागृहामध्ये तरतूद केली जावी असे आवाहन गणाचार्य केले. कर्मचाऱ्यांना पगार कसा दिला कुठून पैसे आले याचा खुलासा करावा अशी मागणीही गणाचार्य केली.

बेस्ट उपक्रम पालिकेचा अंग आहे. पालिका आपल्या विविध विभागासाठी निधीची तरतूद केली अशीच तरतूद बेस्टसाठीही केली जावी अशी मागणीही गणाचार्य यांनी केली. अतुल शाह यांनी बँकेमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा बेस्टला दया. बेस्टच्या आर्थिक परिस्थितीवर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी केली. अनिल पाटणकर यांनी पालिकेने आपल्या विविध विभागाप्रमाणे बेस्टसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. तर सरिता पाटिल यांनीही पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.

कॉंग्रेसचे रवी राजा यांनी बेस्टला तोटा होण्यासाठी प्रशासन दोषी असल्याचा आरोप केला. बेस्टकड़े टीडीएलआर आला पण याचा योग्य विनिमय करण्यात आला नाही. एससी बसचा पांढरा हत्ती आजही पोसला जात असल्याने एसी बस त्वरीत बंद करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली. बेस्टने तुटीचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प पालिकेने परत पाठविला आहे. आता पुन्हा हा अर्थसंकल्प पालिकेकडे पाठवण्यात यावा. स्थायी समिती व सभागृहाचे अधिकार वापरून अर्थसंकल्प मंजूर करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली.

यावर बेस्टला पालिकेकडून निधी मिळावा म्हणून कृती आराखडा बनवण्यात आला आहे. गटनेत्यांच्या बैठकीत हा आरखडा सादर करण्यात आला आहे. पालिकेने आराखड्याला मंजूरी दिल्या नंतर बेस्ट समितीत आराखडा सादर केला जाईल असे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगीतल.

Post Bottom Ad