बेस्ट कर्मचाऱ्याना 21व 22 मार्चला पगार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2017

बेस्ट कर्मचाऱ्याना 21व 22 मार्चला पगार



मुंबई ( प्रतिनिधी ) – श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात चालला आहे.सुमारे 42 हजार बेस्ट कर्मचाऱ्याचा गेल्या फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळालेला नाही. कर्मचाऱ्याना पगार मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाला असून त्यांची आर्थिक गणिते बिघडलेली आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून शिवसेनेने या कमॅचा-यांचा रखडलेला पगार येत्या 21 व 22 माचॅ रोजी दोन टप्प्यात देण्यात येणार आहे त्यासाठी 185 कोटी रुपयांची आवश्यकता लागणार आहे तसेच बेस्ट उपक्रम कमॅचा-यांच्या पगाराची कायम र-वरपात व्यवस्था आता केली जाणार आहे यापुढे पगाराचा प्रश्न उद्भभवू नये व बेस्टला कायमस्वरुपी आथिर्क संकटातून बाहेर काढण्यासाठी या आठवडाभरारातच बेस्ट , पालिका मिळून एक कृती आराखडा तयार करून तोडगा काढला जाणार आहे अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज दिली.
बेस्ट कमॅचा-यांच्या पगाराबाबत तोडगा काढण्यासाठी आज शनिवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सेनेचे पालिकेतील नेते यांची महत्त्व पूर्ण बैठक पार पडली त्यामध्ये वरील तोडगा काढण्यात आला या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता , पालिका सभागृहनेते यशवंत जाधव , र-थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर , बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ , बेस्ट चे महाव्यवस्थापक डाँ जगदीश पाटील आणि पालिका अतिरीक्त आयुक्त संजय मुखर्जी उपस्थित होते मात्र या बैठकीला भाजप , काँग्रेस , राष्ट्रवादी , मनसे , समाजवादी पक्षाचे सदस्य उपस्थित नव्हते. 

बेस्ट कमॅचा-यांन वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा भाजपा, कॉंग्रेसने बेस्ट समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुवेळी उपस्थित केला होता.भाजपाचे सुनील गणाचार्य यांनी महापालिकेकडे पेंग्विनसाठी करोडो रुपये आहेत. मात्र कर्मचाऱ्याना द्यायला पैसे नसल्याची टिका केली होती. भाजपासह कॉंग्रेसने भर बैठकीत बेस्ट आणि महापालिकेचे वाभाड़े काढले होते. यावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेते व उच्च पालिका अधिकारी यांची बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन बेस्ट समितीत देण्यात आले होते.याबाबत शनिवारी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, बेस्ट अध्यक्ष व अधिकाऱ्यांची बैठक झाली. 

या बैठकीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टने तात्पुरता सोडवला आहे. मार्चच्या २१-२२ तारखेला कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार. १८५ कोटीची रक्कम देवून २१ तारखेला ३१ हजार कर्मचाऱ्यांना आणि २२ तारखेला ११ कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार. तूर्तास हा खर्च स्वतः बेस्ट भागवणार आहे. अशी माहिती महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.बेस्ट आर्थिक तुटीत असल्याने व कर्मचाऱ्यांना पगार देण्यास वेळोवेळी होणारी दिरंगाई यावर तोडगा काढता यावा म्हणून एक कृति आराखडा तयार करण्यात येणार आहे अशी माहिती महाडेश्वर यांनी दिली.

सध्या बेस्ट 2000 कोटी संचित तोट्यात तर 2000 कोटी रुपये तोट्याच्या बोझ्याखाली आहे बेस्टला विज आणि परिवहन विभागाचा खर्च कमॅचा-यांचा पगार , भत्ते आदिवरील खर्च बेस्ट बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पाहता उत्पन्नापेक्षा कमी आहे त्यामुळे बेस्ट गेली अनेक वर्षे मोठ्या तोट्यात आहे परिणामी आता बेस्ट कमॅचा-यांना पगार देण्यासाठी ही बेस्ट कडे पैसे नाहीत बेस्टने दोन बँकांकडे 160 कोटींचे कर्ज मागितले आहे हे कजॅ मिळाल्यानंतर येत्या 21 व 22 ला बेस्ट कमॅचा-यांना फेब्रुवारीचा थकित पगार देण्यात येणार आहे

Post Bottom Ad