बेस्ट समितीत कर्मचाऱ्यांचा पगार दया च्या घोषणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2017

बेस्ट समितीत कर्मचाऱ्यांचा पगार दया च्या घोषणा



मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेचे अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुरुवारी संपन्न झाली. निवडणुकीदरम्यान भाजपाने बेस्ट कर्मचार्यांचा पगार आधी दया अश्या घोषणा देत समिती सभागृह दणाणुन सोडले होते.


मुंबई महापालिका व बेस्ट मधील कोणतीही निवडणुक भाजपा लढ़वणार नाही तसेच कोणतेही पद घेणार नाही असे मुख्यमंत्र्यानी जाहिर केले. यानंतर शिवसेनेकडूनच समित्यासाठी अर्ज भरले गेले व सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. बेस्ट समितीसाठी अनिल कोकिळ यांनी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज भरला नसल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोकिळ बिनविरोध निवडल्याचे जाहिर केले.

कोकीळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून येताच भाजपाच्या सद्स्यानी कर्मचारयांचा पगार कधी देणार असा प्रश्न विचारत आधी पगार दयाच्या घोषणा दिल्या. बेस्टच्या पहिल्याच बैठकीत भाजपा आक्रमक रुपात समोर आली. सेनेतून भाजपात गेलेले सुनिल गणाचार्य यांनी सेनेला चांगलेच धारेवर धरले.

महापालिका 8 पेंग्विनसाठी करोडो रुपये खर्च करते मात्र 42 हजार बेस्ट कर्मचाऱ्याना दुय्यम स्थान देत आहे. बेस्ट कर्मचार्याना द्यायला बेस्टकड़े 84 कोटी रुपये नाहीत. बेस्ट सध्या 960 कोटी रुपये तोट्यात आहे. येत्या वर्षात हा तोट्याचा आकडा फुगुन 1067 कोटी रुपये होऊ शकेल असे गणाचार्य म्हणाले. 

यावेळी बेस्टचे महाव्यव्यस्थापक जगदीश पाटील यांनी बँकेकडून बेस्ट 60 कोटी रुपये कर्ज घेत आहे. इतर पैसा बेस्टकड़े आहे. 22 मार्च पर्यंत कर्ज मंजुर होईल त्यानंतर 24 मार्च पर्यंत पगार देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

बेस्ट कर्मचार्यामधुन मी निवडून आलो आहे , त्यामुळे त्यांच्या समस्या मला माहीत आहेत, कर्मचाऱ्यासाठी काम करणार आहे , तसेच सर्वानी मदत केली तर बेस्टला तोटयातून वर काढता येणार आहे, भाजप आता आरोप करत आहे पण आधी भाजपचा ही अध्यक्ष होता...
= अनिल कोकिळ, बेस्ट समिती अध्यक्ष

सेना भाजप हे बेस्ट कर्मचारना वार्यावर सोडत आहे , या आधी भाजपचा अध्यक्ष होता मग परिस्थिति हा सुधरली नाही, आता नवीन अध्यक्ष काय करतात हे पाहावे लागणार आहे
= रवि राजा, बेस्ट समिती सदस्य, कांग्रेस

Post Bottom Ad