बेस्ट वाचवण्यासाठी 3000 कोटी रुपयांचे अनुदान दया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2017

बेस्ट वाचवण्यासाठी 3000 कोटी रुपयांचे अनुदान दया


मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट आज प्रचंड आथिॅक संकटात आहे गेल्या 10 वषाॅत बेस्ट उपक्रम तोटयात असून शिवसेना भाजपाची सत्ता असतानाही मराठी कामगार देशोधडीला लागले आहेत ही बेस्ट वाचवायची असेल तर पालिकेने त्वरित 3000 कोटी रुपयांचे अनुदान बेस्टला दयावे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी बेस्ट कमिटी सदस्य अॅड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे
बेस्ट सुमारे 2500 कोटी रुपयांचा संचित तोटा आहे गेल्या वर्षी 590 कोटी रुपयांचा तोटा असलेला अथॅसंकल्प बेस्टने सादर केला काँग्रेस पक्षाने बेस्ट समिती , पालिका र-थायी समिती , पालिका सभागृहात या विरोधात आवाज उठवला होता नियमानुसार एक लाख रुपयांवर शिल्लकी अथॅसंकल्प सादर करावा लागतो पुन्हा बेस्ट समितीकडे अथॅसंकल्प मंजुरीसाठी पाठविला आहे माहे फेब्रुवारी 2017 चा पगार कमॅचा-यांना दिलेला नाही त्यासाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे गेल्या 10 वषाॅत बेस्ट उपक्रम तोटयात असून शिवसेना भाजपाची सत्ता असतानाही मराठी कामगार देशोधडीला लागले आहेत पालिकेच्या विविध बँकांमध्ये 61510 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत याचे दरवर्षी 4500 कोटी रुपये व्याज मिळत आहेत बेस्टने पालिकेकडे अनुदान देण्याची मागणी केली होती परंतु आजतागायत एकही पैसा पालिकेने अनुदान दिलेले नाही त्यामुळे आता बेस्ट वाचवायची असेल तर पालिकेने त्वरित 300 कोटी रुपयांचे अनुदान बेस्टला दयावे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी बेस्ट समिती सदस्य अॅड संदेश कोंडविलकर यांनी केली आहे

Post Bottom Ad