बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पालिकेचा कृती आरखडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 March 2017

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पालिकेचा कृती आरखडा

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टला सततच्या तोटयातून बाहेर काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बेस्टला तोट्यातून काढ़ण्यासाठी पालिका आता पुढे आली आहे. बेस्टला वाचवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आरखड्याला बुधवारी 29 मार्चला मंजूरी मिळणार आहे. 
बेस्ट उपक्रम सतत घाटयात चालला आहे. बेस्टने मुंबई महापालिकेबरोबर विविध बँकाची कर्ज घेतली आहेत. बेस्टने घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी द्यावयाचा रक्कमेमुले बेस्ट कर्मचाऱ्याना पगार वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली. बेस्ट कर्मचारी संतप्त झाल्याची दखल पालिका प्रशासनाला घ्यावी लागली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पालिका गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून बेस्टला कर्जातुन बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिका बेस्टला एक हजार कोटी रुपयांचा मदतीचा हात देणार आहे. तोट्यातील एसी बसगाड्या कायमच्या बंद करण्याचा विचार करण्यात आला आहे असे कृति आराखडयात म्हटले आहे. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत आराखडा सादर करण्यात आला असून बेस्टला वाचवण्यावर सर्व पक्षीय गट नेत्यांची मत झाले आहे. बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत आराखड्याला मंजूरी दिली जाणार आहे.

निधी कसा उभारणार , याची आधी मुद्देसूद माहिती द्या - आयुक्त या बैठकीला महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते. आराखड्यासंबंधी चर्चा सुरू असताना 'बेस्ट' आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी निधी कोणत्या मार्गाने उभारणार, किती निधी यातून मिळेल, याची आधी मुद्देसूद माहिती द्या, अशी विचारणा आयुक्तांनी महापौरांना स्पष्टपणे केली. मात्र, महापौर यासंबंधी कोणतीही माहिती देऊ शकले नाहीत. परिणामी, २९ मार्च रोजी सायंकाळी पुन्हा गटनेत्यांची बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे.

Post Bottom Ad