पाणीपुरवठा व उपसा जलसिंचन थकीत वीज बिल हप्त्याने भरण्यासाठी प्रोत्साहन योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2017

पाणीपुरवठा व उपसा जलसिंचन थकीत वीज बिल हप्त्याने भरण्यासाठी प्रोत्साहन योजना



मुंबई, 17 मार्च,
राज्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्यांने भरुन ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रोत्साहन योजना आणली आहे अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका निवेदनातून दिली.
सार्वजनिक पाणी पुरवठा व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांचा थकित वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे संबंधीत शेतकरी व गावकऱ्यांना पाणी पुरवठयाच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सदर विद्युत ग्राहकांना थकबाकीची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. 16 झोन मधील 42,050 वीज जोडण्याची थकबाकी 940.07 कोटी एवढी आहे. तर व्याजाची रक्कम 512.09 कोटी आहे. एकूण थकबाकीची रक्कम 1452.15 एवढी आहे.

प्रोत्साहन योजना पुढीलप्रमाणे -1. ही योजना राज्यातील वीजबीलाची थकबाकी असलेल्या सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेसाठी लागू राहील.

2. सध्या असलेल्या मूळ थकीत वीज बीलाच्या रकमेपैकी 20 टक्के रक्कम व चालू महिन्याचे पूर्ण वीज बील ग्राहकाने भरल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत करण्यात येईल.

3. उर्वरित थकबाकीची मूळ रक्कम चार मासिक समान हप्त्यांमध्ये एप्रिल, मे, जून व जूलै या महिन्यांच्या चालू वीज बीलासोबत भरणे आवश्यक आहे. सवलत दिलेले हप्ते चालू वीज बीलासोबत न भरल्यास वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून खंडीत करण्यात येईल.

4. सदरची सवलत ही वीज पुरवठा अद्याप खंडीत न झालेल्या पंरतू थकीत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांनाही लागू राहील.

Post Bottom Ad