महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2017

महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ


मुंबई : महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची बाब उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षांत महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग आदी गंभीर स्वरूपाचे ३२ हजार ५४८ गुन्हे २0१६ साली नोंदवण्यात आले आहेत. बालकांवरील अत्याचाराचे १३ हजार ५९१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. २0१४ साली बलात्काराचे ३ हजार ४३८ गुन्हे नोंदवण्यात आले होते. २0१५ साली ४ हजार १४४, तर २0१६ मध्ये ४ हजार २0९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यांतही वाढ झाली असून विनयभंगाचे ११ हजार ३८८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.बालकांवरील अत्?याचाराच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. २0१६ मध्ये १३ हजार ५९१ बालकांवरील अत्?याचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भ्रूणहत्येचे ४४ गुन्हे नोंद आहेत. बालकांवरील बलात्?काराच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. २ हजार ८६ बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अपहरण व पळवून नेण्याचे ८ हजार १६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.



मुंबई उपनगरी रेल्वेचे वर्षभरात ३ हजार २0२ बळी - 
मुंबईतील उपनगरी रेल्वे ही शहराची लाइफलाइन मानली जाते. मात्र उपनगरी रेल्वे दरवर्षी हजारो बळीदेखील घेत असते. २0१६ मध्ये ३ हजार २0२ जणांचा मृत्यू विविध रेल्वे अपघातांत झाला आहे. यात रूळ ओलांडताना बळी जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. १ हजार ७९८ जणांचा मृत्यू रूळ ओलांडताना झाला आहे. आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.

मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा पश्‍चिम रेल्वे ३७ स्थानके आणि मध्य रेल्वे ६२ स्थानके यांच्याद्वारे चालवली जाते. हार्बर मार्गावर ३८ स्थानके आहेत. दर दिवशी एकूण २0५ गाड्यांच्या मदतीने २ हजार ८५५ फेर्‍यांद्वारे सरासरी ७६.३ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. २0१६ मध्ये  रेल्वे व फलाटा दरम्यान पडून १३ जण मरण पावले.  रेल्वेमधून पडून ६५७ जणांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वेच्या खांबाचा धक्का लागून ८ जणांना, तर अन्य कारणांमुळे ७२६ जणांना जीव गमवावा लागला आहे. विविध अपघातांत ३ हजार ३६३ जण जखमी झाले आहेत.

Post Bottom Ad