भारतीय संविधान वाचवण्यासाठी सेक्युलर पक्षांनी एकत्र यावे - अबू आझमी -मुंबई / प्रतिनिधी - देशात सर्वत्र भाजपा विरोधात वातावरण असतानाही भाजपालाच मतदान कसे होते याची एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली. याचवेळी संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्षानी एकत्र यावे असे आवाहन आझमी यांनी केले आहे.
महाराष्ट्रात 4 हजार शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत, मराठा मुस्लिम समाज आरक्षण मिळत नाही म्हणून नाराज आहे, दलितानी लाखोच्या ऱ्याल्या काढल्या आहेत, नोट बंदी मुले बँकासमोर लाइन लावावी लागल्याने सामान्य माणूस नाराज आहे. समाजात सर्वत्र नाराजी असताना भाजपाला मतदान कसे झाले यात इव्हिएमचा घोटाळा असल्याचा संशय सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. यामुले खरे काय ते लोकांच्या समोर यावे म्हणून एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी आझमी यांनी केली.
देशात इव्हिएम बाबत सुब्रमण्यम स्वामी, लालकृष्ण अडवाणी, किरीट सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये इव्हिएम मशीन बरोबर मतदान कोणाला केले याची स्लिप मिळावी यासाठी मशीन लावण्याचे आदेश दिले. याची अद्याप अमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केला.
संविधान वाचवण्यासाठी एकत्र या -भाजपा देशात धार्मिक तेढ निर्माण करून संविधान बदलू पाहत आहे. संविधान वाचवण्याची जबाबदारी प्रत्तेक सेक्युलर पक्षाची आणि नागरीकांची आहे. देशाला सेक्युलर ठेवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्षानी एकत्र यावे असे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.