मुंबईकरांना ‘पारदर्शक’ काचेमागे पेंग्विनच पाहता येतील - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2017

मुंबईकरांना ‘पारदर्शक’ काचेमागे पेंग्विनच पाहता येतील - उद्धव ठाकरे



मुंबई - पुस्तक आणि टीव्हीवर दिसणारे पेंग्विन मुंबईकरांना ‘पारदर्शक’ काचेमागे मुंबईत पाहता येणार आहेत. ही काच ‘पारदर्शक’ आहे. यामुळे काचेमधून पेंग्विनच दिसतील. वाटल्यास कुणीही येऊन पाहावे, असा टोला भाजपाचा उल्लेख न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. भायखळा येथील वीर जिजामाता प्राणि संग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन कक्षाचे लोकार्पण आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. पेंग्विनवरून वाद घालणाऱयांचा आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. पेंग्विन आणणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरल्याबद्दल अभिमान असल्याचेही सांगत त्यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुकही केले. 

यावेळी बोलताना आपण पेंग्वीनसाठी तापमान योग्य ठेवतो. त्यांच्यासाठी खास वातानुकूलित कक्ष तयार करण्यात आला आहे. पण, एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की सिंगापूरमध्ये पेंग्वीन उघड्यावर ठेवले आहेत. तिकडे हवामान आपल्यासारखेच गरम आहे. एवढेच नाही तर तिथे पोलार्ड बीअरही आणला होता. हा पोलार्ड बीअर तब्बल ३० ते ३५ वर्षे पूर्ण आयुष्य जगला. एक - दोन दिवसापूर्वी त्याचे निधन झाले. याचा अर्थ पोलार्ड बीअर इथे आणावा असे म्हणत नाही असे उद्धव म्हणाले. 

ज्या गोष्टी आपल्या अवाक्यातील आहेत त्या गोष्टी आपण मुंबईकरांसाठी आता नाही केल्या तर कोण करणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. आमचा कारभार हा पारदर्शकच असणार आहे. ज्या ज्या गोष्टी मुंबई करांना लागणार त्या पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. जाहीरनाम्यातील आश्वासने या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

यावेळी आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, माजी महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत (बाळा) नर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता 


पेंग्विनवर पीएचडी करता येणार - अजोय मेहताजर पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पेंग्विन या पक्ष्यांवर पीएचडी करायची असेल तर त्यांना पीएचडी करण्याची संधी दिली जाईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. याशिवाय मुंबईत टेक्स्टाईल म्युझियम तयार करण्यात येणार असून महापालिका, सीएसटी या ठिकाणच्या हेरिटेज चौकाचे अपग्रेडेशन करण्यात येणार असून तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा टुरिझम हब होईल, अशी खात्रीही महापालिका आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.

Post Bottom Ad