रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग देण्याकरीता जनजागृती मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2017

रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग देण्याकरीता जनजागृती मोहीम



मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्यावतीने आणि राधी फाऊंडेशनच्या सहकार्याने रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग देण्याकरीता जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरांत विविध ठिकाणी घडणारे अपघात व अन्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी रुग्णवाहिका (ऍम्ब्युलन्स) सेवा ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी व तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी राधी फाऊंडेशनतर्फे काही नियम सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग द्या, रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी सहकार्य करा. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकल्यावर वाहनचालकाने आपले वाहन रस्त्याच्या डावीकडे नेऊन हळू चालवा. रुग्णाला आणण्यासाठी जात असलेली रिकामी रुग्णवाहिका ही देखील आपत्कालीन परिस्थितीत धावत असते. १२ हजार पोस्टर्स खासगी डॉक्टर्स व रुग्णालयांतील विशेष कक्षात, १ हजार १०८ पालिका शाळांमध्ये, १ हजार उद्याने व खुल्या जागांमध्ये तसेच वाहतूक पोलिसांतर्फे सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी देण्यात आलेली आहेत.तसेच रुग्णवाहिकेच्या मार्गाची माहिती १०० क्रमांकावर पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी, असेही आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे

Post Bottom Ad