गॅस एजन्सी, पेट्रोलपंप वाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2017

गॅस एजन्सी, पेट्रोलपंप वाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण


नवी दिल्ली - गॅस एजन्सी आणि पेट्रोलपंपांच्या वितरणासाठीच्या नियमावलीत तेल मंत्रालयाकडून बदल करण्यात आल्याची माहिती बुधवारी सरकारकडून संसदेत देण्यात आली. नव्या नियमांनुसार अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रता आणि कमाल वयोर्मयादेच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण यात दिले जाणार आहे.
यापूर्वी एलपीजी वितरण एजन्सी २१ ते ४५ वयोगटातील व्यक्तीसच दिली जात असे. नव्या निर्देशांनुसार कमाल वयाची र्मयादा ६0 वर्षांपर्यंत वाढविण्यात आल्याचे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले. तसेच एलपीजी एजन्सीसाठी अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेची अटही पदवीवरून दहावी पास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गॅस एजन्सीसाठीच्या सुरक्षा ठेवीची रक्कमही कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल पंपाच्या वाटपासाठीच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या सुधारणांना मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोलपंप वाटपासाठीही शैक्षणिक पात्रतेचे निकष पदवीवरून १0 वी पासपर्यंत करण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल पंपासाठी लागणारी विशिष्ट आर्थिक रक्कम ही शेड्युल बँकेऐवजी कोणत्याही बँकेतील भाररहित ठेवीच्या स्वरूपात असल्याचा बदल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. पेट्रोल पंपासाठी लागणार्‍या जमीनीबद्दलच्या नियमांसाठी कुटूंबाच्या व्याख्येतही बदल करण्यात आले आहे. नव्या व्याख्येनुसार अर्जदाराची पत्नी किंवा पती, पालक, भावंडे, सावत्र भावंडे, अपत्ये, सावत्र अपत्ये, जावई, सून, सासू-सासरे आणि आजी-आजोबांचाही समावेश कुटुंबात करण्यात आला आहे.

Post Bottom Ad