मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2311 कोटीचा अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2017

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2311 कोटीचा अर्थसंकल्प सादर


मुंबई / अजेयकुमार जाधव - 
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2311 कोटी 66 लाखाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर याना सादर केला. सन 2016 - 17 साठी महसुली उत्पन्न व खर्च 2069 कोटी 53 लाख तर सन 2017-18 साठी महसुली उत्पन्न व खर्च 1953 कोटी 57 लाख इतका अंदाजिलेला आहे.

मुंबई महापालिकेच्या 504 बालवाड्यामध्ये 380 वर्गखोल्यांमध्ये बालवाडी चालवली जाते. यात अंक ओळख, घसरगुंडी, बिन ब्याग, पझल गेम्स, मातिकाम साहित्य, खेळण्यातील वाहने इत्यादी वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 कोटी 76 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फ़त गुणवत्तेचे बळकटीकरण करण्यासाठी डिजीटल शाळा तयार करण्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपयाची, स्यानिटरी नैपकिन वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशीनसाठी 1 कोटी, 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनीसाठी 'बेटी बचाव बेटी पढाओ' उपक्रमासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी शिक्षण विभागाकरिता मुंबई शहरात अद्यावत सभागृह उभारले जाणार आहे त्यासाठी 50 लाख रुपयांची, शाळांमध्ये केंद्रीय ध्वनिक्षेपण यंत्र उभारण्यासाठी 75 लाख, 26 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यात येणार आहेत त्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तरतूद 
>> शालेय इमारती दुरुस्ती 253 कोटी 12 लाख
>> पवई हायलेव्हल स्काउट गाईड शिबिर 3 कोटी
>> व्हर्चुअल क्लासरूम 21 कोटी 84 लाख
>> हाउस किपिंग 71 कोटी 39 लाख
>> खेळांच्या प्रशिक्षकाना मानधन 38.62 लाख
>> सार्वजनिक ग्रंथालय 61 लाख
>> 8 वीच्या विद्यार्थ्याना ट्याब 7 कोटी 83 लाख
>> विद्यार्थ्याना मोफत क्रीडा गणवेश 31 कोटी
>> शैक्षणीक साहित्य व वस्तूसाठी 98 कोटी 18 लाख
>> शिष्यवृत्ती स्पर्धांसाठी 185 कोटी 24 लाख
>> दिव्यांग विद्यार्थ्याना उपस्थिती भत्ता 1 कोटी 16 लाख
>> दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजना 40.94 लाख
>> बालवाडी शाळामध्ये टॉय लायब्ररी 1 कोटी 76 लाख
>> मिनी सायन्स सेंटरसाठी 1 कोटी 37 लाख

Post Bottom Ad