विकास आराखड्याला दोन महिन्याची मुदत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2017

विकास आराखड्याला दोन महिन्याची मुदत वाढ



मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिका निवडणुकीमुळे लटकलेला मुंबईचा सन 2014 - 34 चा विकास आराखडा आणखी दोन महिने लटकणार आहे. निवडणुकीनंतर सभागृहात सभागृहात नवीन नगरसेवकांना अभ्यास करून हरकती, सूचना मांडण्यासाठी दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेते, सदस्यांनी एकमताने घेतला. यामुळे विकास आराखड्याला दोन महिन्याची मुदत वाढ देण्यात येत असल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. 
मुंबईच्या विकास आराखड्याविषयी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध संस्था संघटनांच्या आलेल्या सुचना आणि हरकतीवर घाईघाईतच निवडणुकीपूर्वी सुनावणी झाली. तब्बल 12 हजार 800 सुचना आणि हरकती आल्या होत्या. त्याचा निपटारा करणे हे काम किचकट काम होते. गेल्या 26 नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. मात्र या मुदतीत हे काम पूर्ण न झाल्याने गेल्या 15 जानेवारी पर्यंत विकास आराखड्याच्या सुचना आणि हरकरतींच्या निपटाऱ्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केली होती. 

दरम्यान पालिकेची आचारसंहिता लागू झाली आणि विकास आराखडा लटकला होता. विविध लोकप्रतिनिधींच्या हरकती आणि सुचनांवर सुनावणी होत आहे. लोकप्रतिनिधींच्या बहुतांश हरकती आणि सुचना आरक्षणे हटवा अशीच आहे. विकास आराखडा जसा आहे तसाच ठेवला तर पुन्हा विकास आराखड्यावरून वाद होण्याची शक्‍यता आहे. मुळात पालिकेतून तसेच राज्य सरकाकडून या समितीवर सदस्य नेमण्यात उशीर झाला. 

या आराखड्याचा विषय आज शुक्रवारी पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी पालिका सभागृहात उपस्थित केला. त्यावर र-थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी उपसूचना मांडली. यावेळी सभागृहात बरेच नगरसेवक नवीन आहेत या नवीन नगरसेवकांना विकास आराखड्याचा अभ्यास करता यावा त्याना हरकती, सूचना मांडता याव्यात यासाठी आराखड्याला दोन महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी केली काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी या मागणीला पाठिंबा दिला. 

आराखड्याची माहिती काल रात्री उशिराने नगरसेवकांना दिली त्यामुळे अभ्यास करणे बाकी आहे. यापूर्वीच्या आराखड्यात जास्त, चुका, त्रुटी होत्या त्यामुळे तो आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. आता या आराखड्याचा अभ्यास करायला नगरसेवकांना वेळ लागेल. तेव्हा दोन ते तीन महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी केली भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी केली. 

नवीन नगरसेवकांना आराखड्याचा अभ्यास करून हरकती व सूचना मांडायला दोन महिन्यांची मुदत वाढ द्यावी. या आराखड्याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. 1991 नंतर हा नवीन विकास आराखडा तयार केला जात आहे नवीन नगरसेवकांना तो समजून घेणे अवघड असून पालिकेने साॅप्ट काॅपीसह हार्ड काॅपीही मराठी भाषेतून दयावी अशी मागणी केली. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी रमेश कोरगावकर यांची उपसूचना मंजूर केली

Post Bottom Ad