कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. आमच्यासाठी उत्तर प्रदेशमधील शेतकर्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांची कर्जमाफी आमची प्राथमिकता असल्याचे विधान केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केले आहे. ते अशाप्रकारचे विधान कसे करू शकतात? असा सवाल गाडगीळ यांनी केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर प्रदेशमध्ये शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार तयार असताना राज्यातल्या शेतकर्यांसाठी भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे, असा सवाल केला. नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकला असताना त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले नाही. त्यामुळे त्यांना नवे कर्ज मिळत नाही. शेतकर्यांना समूळ नष्ट करायचे, असे सरकारचे धोरण आहे, असा आरोपही त्यांनी केला. एलबीटीच्या माध्यमातून सरकार व्यापार्यांसाठी १0 हजार कोटींचे नुकसान सहन करते, मग शेतकर्यांसाठी असे नुकसान का नाही सहन करत, असा सवालही त्यांनी केला. कर्जमाफीचा विषय चालू असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांसमोर आणखी अडचणी वाढल्या आहेत. लातूर, बीड, परभणी आदी भागात गारपीट झाली. त्यामुळे हरभरा, कांदा, ऊस अशा पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष आणि फळबागा अडचणीत आल्या आहेत. आता आम्हाला शाब्दिक आश्वासने नको. बैठकांचा फार्सही नको. ताबडतोब कर्जमाफीची घोषणा करा, अशी मागणी मुंडे यांनी केली.
Post Top Ad
16 March 2017
११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेशिवाय मंजूर
Tags
# मुंबई-महाराष्ट्र
Share This
About Anonymous
मुंबई-महाराष्ट्र
Tags
मुंबई-महाराष्ट्र
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.