सफाई कामगारांचे २६ जानेवारीला चक्का जाम आंदोलन - निवडणुकीवर बहिष्कार - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2017

demo-image

सफाई कामगारांचे २६ जानेवारीला चक्का जाम आंदोलन - निवडणुकीवर बहिष्कार

MCGM_Head_Office
मुंबई ( प्रतिनिधी ) – गेल्या १७ वर्षांपासून राज्यातील लाखो सफाई कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या मागण्या येत्या १५ दिवसांत पुर्ण केल्या नाहीत तर पालिकेच्या आगामी निवडणुकांवर बहीष्कार टाकण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने दिला आहे. तसेच सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने मुंबईत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत सुधारणा करून १९८६-८७ च्या शासनादेशात मुंबईतील वास्तव्याची २५ वर्षांची अट शिथिल करून १५ वर्षे करावी तसेच त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. ज्या सफाई कामगारांना घरे नाहीत अशा सफाई कामगारांना १९८८ च्या शासनादेशानुसार ५ टक्के आरक्षित सदनिकांचे वाटप करावे. सफाई काम ही ३६५ दिवस चालणारी अत्यावश्यक सेवा असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठेकेदारी प्रथा बंद करण्यात यावी, सफाई कामगारांची त्वरीत भरती करावी, मंत्रालयासमोरील वाल्मिकी चौकात भगवान महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती स्थापन करण्यात यावी. अनुसूचित जातीच्या आरक्षणातून विशेष आरक्षण या समाजाला देण्यात यावे इत्यादी मागण्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Post Bottom Ad

Pages