मुख्यमंत्री व उद्धव यांच्या स्वागतासाठी पालिका मुख्यालयाला रंगरंगोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2017

मुख्यमंत्री व उद्धव यांच्या स्वागतासाठी पालिका मुख्यालयाला रंगरंगोटी

प्रबोधनकारांच्या तैलचित्राकड़े नगरसेवकांची पाठ 
मुंबई / अजेयकुमार जाधव / 1 Jan 2017 -
मुंबई महापालिकेची निवडणुक तोंडावर आली असताना सत्ताधारी शिवसेना व भाजपाने उद्घाटनाचा सपाटा सुरु केला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी 2 जानेवारीला मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अणावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे. यासाठी मुख्यालयाला रंगरंगोटी करून मुख्यालयाचा चेहरा मोहरा बदलला जात आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्याच्या ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण संगणकीय प्रणालीचे लोकार्पण, शिक्षण खात्याच्यावतीने प्राथमिक शाळांना पूर्वपरवानगी, प्रथम मान्यता आणि मान्यता मुदतवाढ प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण, महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणाऱया सॅनिटेरी नॅपकीन व्हेंडींग मशिनचे लोकार्पण, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने निर्मित नवीन व अद्ययावत महापालिका माहिती संकेतस्थळाचे लोकार्पण आणि अग्निशमन दलाच्यावतीने निर्मित ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशन देखील केले जाणार आहे.मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या स्वागतासाठी पालिका सभागृहामध्ये नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. सभागृहाच्या दरवाज्यांना पॉलिश करून चमकवण्यात आले आहे. पालिका मुख्यालयाच्या भिंती चमकवल्या जात आहेत. मुख्यालयाच्या गेटला रंग मारण्यात आला आहे.

प्रबोधनकारांच्या तैलचित्राकड़े नगरसेवकांची पाठ 
मुंबईला योगदान देणाऱ्या महापुरुषांची 9 तैलचित्रे 2000 साली पालिका मुख्यालयाला लागलेल्या आगीत जळाली होती. हि तैलचित्रे गेल्या १७ वर्षात पालिकेला पुन्हा लावता आलेली नाहीत. यापुढेही हि तैलचित्रे लागणे अशक्य वाटत असल्याने या तैलचित्राच्या रिकाम्या जागेवर प्रबोधनकारांचे तैलचित्र लावावे अश्या सुचना करण्यात आल्या होत्या. जेणे करून सभागृह सुरु असताना महापौरांच्या टेबलामागील बाजूच्या भिंतीवर नगरसेवकांच्या समोर प्रबोधनकारांचे तैलचित्र समोर दिसत राहील. परंतू या सुचनेकड़े दुर्लक्ष करत महापौरांच्या सभागृहातील आसना समोरील भिंतीवर प्रबोधनकारांचे तैलचित्र लावले जात आहे. यामुळे सभागृह चालु असताना प्रबोधनकारांच्या तैलचित्राकड़े महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व चिटणीस विभागातील काही कर्मचारी वगळता सर्व नगरसेवकांची पाठ असणार आहे. मुंबई महापालिका सभागृहात 9 तैलचित्रापैकी फ़क्त नाना शंकर शेठ यांचे एकमेव तैलचित्र पालिका सभागृहात आहे. या तैलचित्राच्या बाजुला प्रबोधनकारांचे साड़े सहा फुट बाय सात फुटाचे तैलचित्र लावले जात आहे. या तैलचित्रासाठी वापरण्यात येणाऱ्या फ्रेमचे वजन सावरू शकेल अशी ब्र्याकेट मार्केटमध्ये उपलब्ध नसल्याने ख़ास करून बनवून घेण्यात आली आहेत.

Post Bottom Ad