राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. म्हसे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2017

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. म्हसे

मुंबई, दि. 4 Jan 2017 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्या. संभाजीराव म्हसे तर तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह इतर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज याबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. अधिसूचनेनुसार आयोगाचे अध्यक्ष श्री. म्हसे यांच्यासह तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. सर्जेराव भाऊराव निमसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रा. चंद्रशेखर भगवंतराव देशपांडे (अमरावती ), प्रा. डॉ. राजाभाऊ नारायण करपे (औरंगाबाद), डॉ. भूषण वसंतराव कर्डीले (नाशिक),डॉ. दत्तात्रय दगडू बाळसराफ (पुणे), डॉ. सुवर्णा तुकाराम रावळ (मुंबई), डॉ. प्रमोद गोविंदराव येवले (नागपूर) यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Post Bottom Ad