जर्नलिस्ट्स युनियन द्वारे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2017

demo-image

जर्नलिस्ट्स युनियन द्वारे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

articlimage-award
मुंबई / प्रतिनिधी - "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" व मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. 
"जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" हि पत्रकार संघटना कामगार कायद्याखाली नोंदणीकृत असून पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांसाठी २००४ पासून कार्यरत आहे. तसेच "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" मुंबई महापालिकेतील युनियनचे यूनिट म्हणून गेले 4 वर्षे कार्यरत आहे.

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता "पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा" आयोजित केला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, जी. डी. आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे उत्कृष्ट काम करणाऱ्या जेष्ठ व नवोदित पत्रकारांचा यावेळी पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर तर पाहुणे म्हणून बेस्ट उपक्रमाचे उप जनसंपर्क अधिकारी मनोज व्हाराड़े तसेच युनियनच्या मागणीनुसार मिरा भाईंदर मधील उद्यानाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देणाऱ्या मिरा भाईंदर महापालिकेच्या नगरसेविका नयना वसानी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनियनचे अध्यक्ष नारायण पांचाळ भुषवणार आहेत. तरी या कार्यक्रमास पत्रकारांनी मोठ्या संखेने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युनियन द्वारे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Pages