नाका कामगारांच्या मागण्यासाठी ‘उचल्या’कार मुंबईतील नाक्यांवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2017

नाका कामगारांच्या मागण्यासाठी ‘उचल्या’कार मुंबईतील नाक्यांवर

मुंबई , १ जानेवारी २०१७ -
नोटाबंदीच्या निर्णयानंतर हाताला रोजगारही मिळणे कठीण झालेल्या नाका कामगारांना त्यांच्या न्याय आणि हक्कांची माहिती देण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी मुंबईतील अनेक नाक्यांवर जाऊन बांधकाम, नाका कामगारांची भेट घेतली. नोटांदीमुळे मुंबईसह राज्यातील लाखो बांधकाम, नाका कामगारांवर आलेले रोजगारांचे आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक संकटाबद्दलच्या व्यथा जाणून घेतल्या. 

बंजारा नाका कामगार संघटनेकडून मागील १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या नाका, बांधकाम आदी असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठीच्या राज्यव्यापी जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानाचा समारोप ३ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात होत आहे.  या अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या मुंबई, पुणे, नागपूरसह मुख्य शहरांतील बांधकाम कामगारांच्या नाक्यांवर असलेल्या कामगारांपुढे नोटांबंदीने संकट उभे केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रंग कामगार, कडिया, लेहार, सुतार काम करणाºया कामगारांवर रोजगार मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली असून त्या पार्श्वभूमीवर रविवारी ‘उचल्या’कारांनी नोटामुंबईतील गोरेगाव, दिंडोशी, मालाड, आरे कॉलनी परिसरात सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान नाक्यांवर रोजगारासाठी उभ्या असलेल्या कामगारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यापुढे निर्माण झालेल्या आर्थिक संकटांची माहिती घेतली. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने हजारो कामगार हे दशोधडीला लागले असून आता त्यांची करण्यात येत असलेली नोंदणीची अट ही ९० दिवसांची करण्याऐवजी ती ३० दिवसांच्या कामांवरच करण्यात यावी, यासाठी आपणही सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी संघटनेचे प्रमुख अ‍ॅड. नरेश राठोड आदी अनेक कार्यकर्ते सोबत होते. 

नाक्या-नाक्यांवर काम करत असलेले कामगार हे दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, अल्पसंख्यांक आदी जाती-जमातीतील असून त्यांच्या विकासासाठी मागील आघाडी सरकारने कायदा केला असला तरी त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. यामुळे त्यांना कायद्याने मिळालेले अधिकारही नीट माहिती नसून बंजारा नाका कामगार संघटनेच्या राज्यव्यापी अभियानातनू किमान त्यांना आपले अधिकार काय आहेत, हे कळावे यासाठी आपण अनेक नाक्यांवर जाऊन कामगारांना माहिती देत असल्याचेही ‘उचल्या’कारांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad