पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अभिनव संकल्प स्पर्धेचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2017

पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अभिनव संकल्प स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. 4 Jan 2017 : घरगुती कच-याची विल्हेवाट लावताना नागरिकांकडून समृद्ध पर्यावरणाचे रक्षणही व्हावे, या हेतूने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ‘अभिनव संकल्प स्पर्धा 2017’ चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा गृह संकुलांसाठी असून, राज्य प्रदुषणमुक्त करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गृह संकुलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे केले.
या स्पर्धेची माहिती देताना कदम म्हणाले की, सुधारित घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, आणि दैनिक लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणविषयक संकल्प करण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि संकुले यांच्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या शहरातील गृहनिर्माण संस्था व संकुले यांच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

कच-याचे वर्गीकरण व विघटनाची जबाबदारीघनकच-याचे जैविक पद्धतीने विघटन (ओला कचरा), विघटन न होणारा कचरा (सुका कचरा), घरगुती घातक घनकचरा (ई –वेस्ट इ.) अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करून घनकचरा गोळा करणा-या व्यक्ती अथवा संस्था यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. घरातील ओल्या कच-यातून सेंद्रिय खतनिर्मीती करणे आणि सुका कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याविषयी कृतीशील पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणा-या गृहनिर्माण संकुलांनाच या स्पर्धेत सहभाग होता येईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या mpcb.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रवेशिका 30 मार्च 2017 पर्यंत mpcbnewyear@gmail.com या ईमेल वर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad