भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसर विकासासाठी केंद्र सरकारचा निधी देणार - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2017

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसर विकासासाठी केंद्र सरकारचा निधी देणार - रामदास आठवले

मुंबई -- भिमाकोरेगाव येथे पेशवे सैन्य आणि  शूर महार सैनिकांमध्ये  झालेल्या ऐतिहासिक लढाईत महारवीरांनी अतुलनीय शौर्य दाखवून पेशव्यांचा पाडाव केला त्या शूर महारवीरांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भिमाकोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला आहे या विजयस्तंभास भेट देऊन डॉ बाबाबासाहेब आंबेडकर दरवर्षी मानवंदना  देत असत  1 जानेवारी शौर्यदिनास लाखो आंबेडकरी जनता या  विजयस्तंभास भेट देते भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसराचा पर्यटन दृष्टीने अधिक विकास करण्यासाठी  केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीकन्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज दिले

भिमाकोरेगाव विजयस्तंभाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात नामदार रामदास आठवले यांनी  प्रमुख मार्गदर्शन केले व ऐतिहासिक भिमाकोरेगावच्या लढाईत शाहिद झालेल्या शूरवीर महार सैनिकांना आदरांजली वाहिली

भिमाकोरेगावच्या  लढाईतील ऐतिहासिक  विजयाला पुढील वर्षी द्विशतक पूर्ण होत आहे .यंदाच द्विशकीवर्षाला प्रारंभ झाला आहे त्यामुळे भिमाकोरेगावाच्या ऐतिहासिक विजयस्तंभ परिसर विकासासाठी लगत ची जागा विजयस्तंभ स्मारकाला मिळवून देऊ त्यासाठी केंद्रसरकारकडे प्रयत्न करू असे नामदार रामदास आठवले म्हणाले

1जानेवारी 1818 रोजी भिमाकोरेगावाच्या ऐतिहासिक लढाईत 30हजार पेशवे सैनिकांचा पाडाव केवळ पाचशे शूर महार सैनिकांनी केला आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय  शौर्यापासून  प्रेरणा घेण्यासाठी आंबेडकरी जनता 1जानेवारीस शौर्यदिन साजरा करते  भिमाकोरेगावच्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने  येथे एकत्र येतात  त्यामूळे विजयस्तंभ स्मारक परिसरास जागा अपुरी पडते तेथे अधिक जागा मिळवून देऊ आणि या परिसराचा पर्यटनदृष्टीने विकास करू त्यासाठी केंद्र सरकारचा राज्यमंत्री म्हणून प्रयत्न कारणार असल्याचे नामदार रामदास आठवले म्हणाले यावेळी रिपाइंचे एम डी शेवाळे नवनाथ कांबळे महेंद्र कांबळे बसलासाहेब जानराव महेश शिंदे सिद्धार्थ धेंडे चंद्रकांता सोनकांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad