खरेदी केलेल्या ३०३ नवीन बस वेळेत मिळवण्यात बेस्ट प्रशासन अपयशी - काँग्रेस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2017

खरेदी केलेल्या ३०३ नवीन बस वेळेत मिळवण्यात बेस्ट प्रशासन अपयशी - काँग्रेस

मुंबई ३ जानेवारी २०१७ - 
बेस्ट प्रशासनाकडून मुंबईकरांना ३०३ नवीन बसेस् देण्याचे आश्वासन पाळण्यात आले नसून डिसेम्बर १६ च्या अखेरीस ८ तारखेला पहिली नमुना बस येईल असे प्रस्ताव मंजूर करताना सांगितले गेले होते, मात्र जानेवारी उजाडून आला तरी टाटाकडून सदर बस अद्यापपर्यंत आलेली नाही , मुळात हीच बस आली नसल्याने मूळ ३०३ बसेस बेस्ट च्या ताफ्यात येण्यास विलंब होत असल्याने हि मुंबईकरांची फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेस सदस्य रवी राजा यांनी आज हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला .
मुंबई महानगरपालिकेकडून नवीन बसेस खरेदीसाठी १०० कोटी मदत मिळाली असून या पैशातून टाटांकडून ३०३ बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव ३ मार्च २०१६ रोजी मंजूर केला गेला , त्यावेळी ८ डिसेम्बर ला नमुना बस येईल व सलग तीन महिन्यात ३०० बसेस येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आपल्या माहितीनुसार जानेवारी अखेरपर्यंत नमुना बस येणार नसल्याने त्यानंतर १ महिन्यानंतर पहिल्या १०० बस येतील त्यामुळे झालेल्या या विलंबास सर्वस्वी बेस्ट प्रशासन जबाबदार असून प्रशासनाकडून योग्य तो पाठपुरावा केला जात नसल्याने मुंबईकरांना नवीन बसेस वेळेवर मिळत नसल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. मुंबईकरांना केवळ स्वप्ने दाखवण्यात येत असून निवडणुकीपूर्वी नवीन बसेस येणार नाहीत , त्यातच बेस्ट च्या बसताफ्यात बसगाड्यांची संख्या खूपच कमी झाल्यामुळे बेस्ट ला दिवसाला २ कोटी रुपये तोटा होत असल्याचा आरोप हि रवी राजा यांनी केला . रवी राजा यांच्या सूचनेला पाठिंबा देताना शिवजी सिंग यांनी बेस्ट चे बसमार्ग वाढले असल्याने नवीन बसेस ची तातडीने गरज असल्याचे सांगितले.

यावर आपली भूमिका विशद करताना महाव्यवस्थापक डाँ. जगदीश पाटील यांनी टाटा मोटर्सला ३०३ बसगाड्यांची ओर्डेर दिली तेव्हा त्यांनी नऊ महिन्यात नमुना बस दाखविण्याचे मान्य केल्याचे सांगत , मात्र यासाठी एक महिना विलंब झाल्याचे त्यांनी कबुल केले. मार्च अखेरपर्यंत १०० बसेस पुरवण्यात टाटा मोटर्सला सांगण्यात आले असून विलंब झाल्यास करारातील अटी -शर्तींप्रमाणे कारवाई केली जाईल यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांनी यापुढे नवीन बसेस मुंबईकरांच्या लवकरात लवकर उपलबध करण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे पाठपुरावा करावा तसेच आतापर्यंत केलेल्या प्रयत्न्नांची माहिती सर्व सदस्यांना द्यावी असे आदेश दिले .

Post Bottom Ad