बेस्ट कॅरम स्पर्धेत नीलेश, श्रावणी अजिंक्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2017

बेस्ट कॅरम स्पर्धेत नीलेश, श्रावणी अजिंक्य

मुंबई : बेस्ट कला व क्रीडा मंडळ-बैठे खेळ विभाग आयोजित वार्षिक कॅरम स्पर्धेमधील मिश्र दुहेरी गटात नीलेश परब, श्रावणी कोबनाक यांनी अजिंक्यपद पटकावले. निलेश आणि श्रावणी यांनी प्रतिस्पर्धी जोडी दिलीप सांडगे, विशाखा बोरकर यांचा २-१ असा पराभव केला. निर्णायक गेममध्ये निलेश परब, श्रावणी कोबनाक यांच्या अप्रतिम खेळात एकसूत्रात आल्यामुळे बरोबरी नंतरचा गेम सहज जिंकला. दिलीप सांडगे, विशाखा बोरकर यांनी पहिल्या व दुसर्‍या गेममध्ये सुंदर खेळ केला.

मिश्र दुहेरी कॅरम स्पर्धेमधील निलेश परब व श्रावणी कोबनाक विरुद्ध दिलीप सांडगे व विशाखा बोरकर यांच्यामधील अंतिम फेरीची लढत तब्बल पावणोदोन तास रंगली. दोन्ही प्रतिस्पध्र्यांनी पहिल्या दोन गेममध्ये एकमेकांचा पराभव करून सामन्यातील चुरस वाढवली. निलेश परब व श्रावणी कोबनाक यांनी पहिला गेम २५-१८ असा तर दिलीप सांडगे व विशाखा बोरकर यांनी दुसरा गेम २५-८ असा जिंकून १-१ अशी बरोबरी केली. निलेश परब व श्रावणी कोबनाक यांनी बोर्डवर वर्चस्व राखत तिसर्‍या निर्णायक गेममध्ये २५-१८, ८-२५, २५-५ अशी बाजी मारली आणि विजेतेपदाला गवसणी घातली.

Post Bottom Ad