हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईत ‘वायू’ यंत्रणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2017

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईत ‘वायू’ यंत्रणा

मुंबई, दि. 4 Jan 2017 : शहरातील कलानगर, सायन आदी वाहतूक कोंडी होत असलेल्या परिसरातील हवा प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने तेथील हवेची गुणवत्ता सुधारणारी ‘वायू’ (विंड ऑग्मेंटेशन आणि प्युरिफायिंग युनिट) ही यंत्रणा पर्यावरण विभागाच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी, 5 जानेवारीला सकाळी 11 वाजता वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथे होणार आहे. 
या सोहळ्यास पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, खासदार पूनम महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर स्नेहल अंबेकर हे उपस्थित राहणार आहेत.

मुंबई शहरातील वांद्रे, सायन, भांडुप व घाटकोपर या ठिकाणी नीरी (नॅशनल एन्व्हायरमेंट इंजीनिअरींग रीसर्च इन्स्टिट्यूट) आणि आय.आय.टी.च्या सहयोगाने ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आली आहे. वाहनांच्या प्रदूषणामुळे हवेत मिसळले जाणारे घातक वायू किंवा हवेतील धूलीकण या यंत्रणेमार्फत शोषले जाऊन शुद्ध हवा वातावरणात परावर्तित केली जाणार आहे. हे युनिट हवेचा वेग वाढवून प्रदूषके निवळणे आणि सक्रिय प्रदूषके काढून टाकणे या दोन तत्वांवर चालणार आहे.

Post Bottom Ad