उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर निवडणूकीच्या तारखा जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2017

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर निवडणूकीच्या तारखा जाहीर

- ११ जानेवारीपासून निवडणुकीचा अधिसूचना
- ४ फेब्रुवारीपासून मतदान 
- ११ मार्चला मतमोजणी 
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर विधानसभांसाठी निवडणुका होत आहेत. ११ जानेवारीपासून निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून ४ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. सर्व पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ११ मार्च रोजी होणार आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीने सुरुवात तर उत्तर प्रदेश निवडणुकीने पाच राज्यांच्या निवडणुकीचा शेवट होणार आहे. ४ फेब्रुवारी ते ११ मार्च असा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम असेल. गोवा, पंजाब आणि उत्तरखंडमध्ये एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक ७ टप्प्यात मतदान होणार आहे.  उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर व पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, गोवा यासह इतर राज्यांच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपणार आहे.

पाच राज्यातील निवडणूक प्रक्रिया -
गोवा विधानसभा निवडणूक (४०) :

निवडणुकीची अधिसूचना - ११ जानेवारी २०१७
अर्ज दाखल करण्याची मुदत - १८ जानेवारी २०१७
अर्ज छाननी - १९ जानेवारी २०१७
अर्ज माघारीची मुदत - २१ जानेवारी २०१७
मतदान ४ फेब्रुवारी २०१७ मतदान,
मतमोजणी व निकाल - ११ मार्च २०१७

पंजाब विधानसभा निवडणूक (११७)
निवडणुकीची अधिसूचना - ११ जानेवारी २०१७
अर्ज दाखल करण्याची मुदत - १८ जानेवारी २०१७
अर्ज छाननी - १९ जानेवारी २०१७
अर्ज माघारीची मुदत - २१ जानेवारी २०१७
मतदान ४ फेब्रुवारी २०१७ मतदान,
मतमोजणी व निकाल - ११ मार्च २०१७

उत्तराखंड विधानसभा निवडणूक (७१): 
निवडणुकीची अधिसूचना - २० जानेवारी २०१७
अर्ज दाखल करण्याची मुदत - २७ जानेवारी २०१७
अर्ज छाननी - २८ जानेवारी २०१७
अर्ज माघारीची मुदत - ३० जानेवारी २०१७
मतदान १५ फेब्रुवारी २०१७
मतमोजणी व निकाल - ११ मार्च २०१७

मणिपूर विधानसभा निवडणूक (६०) :
पहिला टप्पा -
निवडणुकीची अधिसूचना - ८ फेब्रुवारी २०१७
अर्ज दाखल करण्याची मुदत - १५ फेब्रुवारी २०१७
अर्ज छाननी - १६ फेब्रुवारी २०१७
अर्ज माघारीची मुदत - १८ फेब्रुवारी २०१७
मतदान ४ मार्च २०१७ मतदान,
मतमोजणी व निकाल - ११ मार्च २०१७
दुसरा टप्पा
निवडणुकीची अधिसूचना - ११ फेब्रुवारी २०१७
अर्ज दाखल करण्याची मुदत - १८ फेब्रुवारी २०१७
अर्ज छाननी - २० फेब्रुवारी २०१७
अर्ज माघारीची मुदत - २२ फेब्रुवारी २०१७
मतदान ८ मार्च २०१७ मतदान,
मतमोजणी व निकाल - ११ मार्च २०१७

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (४०३) :
एकूण सात टप्प्यात मतदान

पहिला टप्पा मतदान - ११ फेब्रुवारी
दुसरा टप्पा - १५ फेब्रुवारी २०१७
तिसरा टप्पा - १९ फेब्रुवारी २०१७
चौथा टप्पा - २३ फेब्रुवारी २०१७
पाचवा टप्पा - २७ फेब्रुवारी २०१७
सहावा टप्पा - ४ मार्च २०१७
शेवटचा व अंतिम टप्पा - ८ मार्च २०१७

- ५ राज्यात एकूण ६९० विधानसभा जागांवर निवडणूक 
- ५ राज्यात ६९० विधानसभा जागांसाठी निवडणूक, सुमारे १६ कोटी मतदार
- ५ राज्यातील 16 कोटी मतदार निवडणुकीत मतदान करणार

Post Bottom Ad