मोदी यांचे देशाला संबोधून केलेले भाषण हे अत्यंत निराशाजनक - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2017

मोदी यांचे देशाला संबोधून केलेले भाषण हे अत्यंत निराशाजनक - संजय निरुपम

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणात नोटाबंदी बाबत लोकांना दिलासा मिळेल अशा काहीच घोषणा केलेल्या नाहीत. त्यांचे भाषण अत्यंत निराशजनक होते. लोकांना अशी अपेक्षा होती कि नोटाबंदी बाबत नवीन वर्षाची भेट म्हणून मोठा दिलासा मिळेल, परंतु त्याबाबाबत मोदींनी एक शब्द हि काढला नाही. या उलट पहिले विदेश मंत्री म्हणून जगभर फिरत होते आणि आता आज अर्थमंत्री असल्यासारखे भाषण केले. जणू काही पुढचे बजेटच त्यांनी वाचून काढले. मग अर्थमंत्री अरुण जेटली फेब्रुवारी महिन्यात काय जाहीर करणार, काय बोलणार ? असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी विचारला.

संजय निरुपम पुढे म्हणाले कि नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीला पाठिंबा देणाऱ्या देशवासियांना शाबासकी दिली, परंतु स्वतःचेच पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर रांगेत उभे राहताना सुमारे १०० लोक मरण पावले त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही, त्याबाबत हि ते एक शब्द बोलले नाहीत. याची मला मनापासून खंत वाटते. नोटाबंदीमुळे भारतात लोक स्वतःचे पैसे स्वतःच्या इच्छेप्रमाणे काढू शकत नाहीत, त्यावर या सरकारने निर्बंध लादलेले आहेत, हे निर्बंध हटविण्याबाबत ते काहीच कसे बोलले नाहीत. त्यामुळे लोकांना अजिबात दिलासा मिळालेला नाही.

तसेच नोटाबंदी नंतर किती काळे धन बँकांमध्ये जमा झाले आणि भ्रष्टाचार थांबला का ? याची काहीच माहिती आपल्या देशवासियांना त्यांनी दिलेली नाही. अर्थव्यवस्थेचे १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले, त्याबद्दल काहीच बोलले नाहीत, तसेच ४५ लाख लोक बेरोजगार झालेलं आहेत, त्यांच्याबाबत काही उपाय योजना त्यांनी जाहीर केल्या नाहीत आणि छोटे व मध्यम उद्योजक हवालदिल झालेले आहेत, त्याबाबत हि त्यांनी एक शब्द काढला नाही, अशा अनेक अति महत्वाच्या मुद्द्यावर ते गप्प का राहिले ? नवीन नोटांची किती प्रमाणात छपाई झाली, याबाबत हि ते गप्प राहिले. कुठलीच आकडेवारी त्यांनी लोकांसमोर ठेवलेली नाही. ते नेहमीच बोलत आले कि मोठ्या नोटांमुळे काळेधन वाढते मग त्यांनी २००० हजाराची नवीन मोठी नोट का आणली ? आम्ही विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर त्यांनी का नाही दिले, असे संजय निरुपम म्हणाले.

संजय निरुपम पुढे म्हणाले कि त्यांनी लोकांकडे ५० दिवस मागितले होते त्याची मुदत आता संपलेली आहे. ५० दिवस संपले तरी हि सामान्य लोकांना अजून काहीच फायदा झालेला दिसत नाही आहे, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे होते, परंतु नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण निराशा केलेली आहे

Post Bottom Ad