रस्त्यांच्या कामांचे 80 कोटीचे बोगस प्रस्ताव स्थायी समितीने फेटाऴले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2017

रस्त्यांच्या कामांचे 80 कोटीचे बोगस प्रस्ताव स्थायी समितीने फेटाऴले

स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली चौकशीची मागणी - 
मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिकेच्या रस्ते कामांतील घोटाळा उघड झाल्यानंतरही रस्ते विभागाचा गैरकारभार सुरूच असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. कामे पूर्ण झालेल्य़ा नवीन रस्त्यांच्या दुरुस्ती कामांचे तसेच पावसांत रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी स्थायी समितीत प्रशासनाने आणलेले 80 कोटींचे बोगस प्रस्ताव फेटाळण्यात आले. येणार्या पावसांळ्यात रस्त्यावर खड्डे किती पडणार हे प्रशासनाला कसे कळले, असा संतप्त सवाल विचारत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रस्तावांच्या भाऊगर्दीत मंजूर करून घेण्यासाठी प्रशासनाने घुसवलेले हे खोटे प्रस्ताव असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळून चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे य़ांनी दिले.

पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्य़ापूर्वी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधीच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. मंगळवारी स्थाय़ी समितीत मंजुरीसाठी आणलेल्य़ा प्रस्तावात अजून 9 रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव घुसवत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. 9 रस्ते दुरुस्तीचे 80 कोटीचे प्रस्ताव होते. हे प्रस्ताव नुकतेच पूर्ण झालेल्या नवीन रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव असल्य़ाचे स्पष्ट झाले. येत्या पावसांत या रस्त्य़ावर खड्डे प़डतील हे प्रशासनाला आधीच कसे कळले? म्हणजे नुकत्याच झालेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार नाहीत असेच प्रशासनाला वाटते आहे का असा सवाल नगरसेवकांनी केला. पावसांत किती खड्डे पडणार हेही प्रशासनाला आधीच कसे कळले याचे आश्चर्य व्यक्त करीत यांमध्ये घोटाळा झाल्याची शक्यता असल्याने याची चौकशी करावी अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली. रस्ते घोटाऴा गाजत असताना शिवाय यांमध्ये काही अधिका-यांव कारवाईही झाली आहे. असे असतानाही रस्ते विभागाचा गैरकारभार थांबलेला नसल्याचे उघड झाले. खोटे प्रस्ताव आणून पुन्हा घोटाळा करण्याचा रस्ते विभागाचा डाव असल्याचे सांगत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. दरम्य़ान या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याने रस्त्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.

Post Bottom Ad