कर्करोगावर आशेचा किरण ठरणार तिबेटियन उपचारपद्धती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

कर्करोगावर आशेचा किरण ठरणार तिबेटियन उपचारपद्धती

मुंबई - बदलती जीविशैली तसेच असंतुलित आहार किंवा षोषण यामुळे कर्करोग, मधुमेह तसेच अनेक आजार आपल्याला होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होताना दिसून येतो. या सर्वांवर तिबेटियन औषधं उपचारपद्धती आशेचा किरण ठरणार आहे.

आजच्या काळात कर्करोगासारख्या असाध्य आजाराने त्रस्त असलेल्यांची संख्या वाढू लागलेली आहे. हा आकडा प्रत्येक मिनिटाला दोघांजणांना कर्करोगाची बाधा झाल्याच्या प्रमाणाइतका गंभीर झाल्याचे चित्र दिसून येते. यामागचे मुख्य कारण म्हणजे बदलते औद्योगिकरण, जीवनशैली, लोकसख्या वाढ हे असल्याचे दिसून येते. भारतात 1971 साली वयाच्या 45 वर्षी, 1991 साली 62 वयापर्यंत आणि 2021-25 कालावधीत वयाच्या 71 व्या वर्षीदेखील कर्करोगासारखा असाध्य आजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पेशींमधील अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होतो आणि ही वाढ नंतर शरीरभर पसरू लागते. हा आजार बरा करण्यासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशनच्या पद्धतीचे उपचार सध्याच्या प्रचलित उपचारपद्धतीनुसार करण्यात येतात. त्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ रोखण्यास मदत होते. पण त्यामुळे इतर चांगल्या पेशीदेखील नष्ट होऊ लागतात. हा या पद्धतीचा दुष्परिणाम आहे. केमोथेरपी व रेडिएशनमुळे अॅनिमिया, निर्जलीकरण, डोकेदुखी, मोनोपॉज, स्मृतीभ्रंश, आतड्यांमध्ये अडथळा, उलटी, बद्धकोष्ठ, डायरिया, कोरडे तोंड, केस गळणे, हृदयाच्या समस्या, त्वचेचे आजार, हार्मोन्समधील बदल, निद्रानाश अशा अनेक समस्या निर्माण होतात.

या सर्वांवर उपयुक्त ठरेल अशी उपचारपद्धती म्हणजे तिबेटियन औषधं तिबेटियन औषधं ही पर्यायी उपचारपद्धतीचा एक घटक मानला जातो. त्याचे परिणाम हे प्रभावी असतात. आयुर्वेदाचीच एक शाखा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. तसा उल्लेख बुद्ध साहित्यांमध्येही आढळून येतो. तिबेटियन औषधं ही नाडी, मलमूत्र व आहाराच्या विश्लेषणाशी निगडीत आहेत तसेच त्याच्याच औषधी वनस्पती तसेच नैसर्गिक क्षार यांचा अंतर्भाव आहे. त्याचा अवलंब केला तर आपण परत आपले आरोग्य पहिल्यासारखे मिळवू शकतो, आनंदी राहू शकतो. त्याचबरोबर यात कुठलेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. 

Post Bottom Ad