शाळा सुरू होण्यापूर्वी मिळणार विद्यार्थ्यांना बुट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

शाळा सुरू होण्यापूर्वी मिळणार विद्यार्थ्यांना बुट

मुंबई - शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूं, गणवेष, बुट मिळत नाहीत अश्या तक्रारी सातत्याने येत असतात. त्यामुळे महापालिकेमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्या पूर्वीच बूट आणि मोजे मिळावेत म्हणून नोव्हेंबरमध्येच निविदा काढण्यात आल्या. या खर्चाला मंजुरी मिळावी असा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेचा गणवेष, बुट, मोजे, वह्या, दप्तर, छत्री, रेनकोट अश्या २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात असे सांगण्यात येते. वास्तविक शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी तर कधी सहा महिन्यांनी या वस्तू विद्यार्थ्यांना मिळत असतात. याबाबत अनेक वेळा शिक्षण समिती, स्थायी समिती व पालिका सभागृहात नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत वस्तू मिळत नसल्यामुळे पालिका प्रशासनाही सतत नाचक्की होत होती. याची गंभीर दखल खुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली असून शाळा सुरू होण्यापुर्वी शैक्षणिक वस्तूं विद्यार्थ्यांच्या हातात मिळाव्या यासाठी नोव्हेंबरमध्येच निविदा काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गणवेषासह बुटांच्या निविदा काढण्यात आल्या. यापैकी गणवेषाच्या प्रस्तावाला गेल्याच आठवड्यात स्थायी समितीने मंजूरी दिली. तर बुट व मोजे खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

पूर्व प्राथमिकसह इयत्ता पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 29 कोटी 38 लाख रुपयाचे बुट व मोजे खरेदी करण्यात येणार आहेत. प्रती बुट 273 रुपये ते 418 रुपयाला खरेदी करण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या मंजूरीनंतर कार्यादेश मिळाल्यापासून 45 दिवसात बुट व मोज्यांचा पुरवठा करण्याची कंत्राटदाराला मुदत देण्यात आली आहे. 2017-2019 या दोन शैक्षणिक वर्षासाठी ही खरेदी करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात शाळा सुरू होण्यापुर्वी बुट व मोजे मिळणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. आले.

Post Bottom Ad