महापौरांच्या हस्ते डॉकयार्ड रोड ते रोझरी शाळा पादचारी पुलाचे भूमिपूजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2016

महापौरांच्या हस्ते डॉकयार्ड रोड ते रोझरी शाळा पादचारी पुलाचे भूमिपूजन

मुंबई = दर दिवशी सुमारे २५ हजार नागरिकांना माझगांव भागातील रोझरी शाळा ते डॉकयार्ड रोड स्टेशन हा रहदारीचा चौक/रस्ता अडचणींचा सामना करुन ओलांडावा लागत होता. तथापि, नागरिकांची ही गैरसोय आता थांबणार असून, बृहन्मुंबई महापालिकेने या ठिकाणी पादचारी पुलास मंजुरी दिली असून त्याचे भूमिपूजन मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते काल (दिनांक २५ डिसेंबर,२०१६) करण्यात आले.
माझगांव भागातील बहुतांश नागरिक हे डॉकयार्ड स्टेशन येथून रेल्वेने प्रवास करतात. या स्थानकावर येण्यासाठी रोझरी शाळेचा चौक ते डॉकयार्ड रोड स्टेशन हा मार्ग अत्यंत रहदारीचा व अडचणीचा आहे. या चौक व परिसरांत नागरिकांच्या हितासाठी पादचारी पुल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत होते.स्थानिक नगरसेविका तथा बाजार व उद्याने समितीच्या अध्यक्षा श्रीमती यामिनी जाधव यांच्या पुढाकाराने या पुलासाठी महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासन यांची बैठक घेण्यात आली. यासाठी दोन्ही प्रशासनांकडे श्रीमती जाधव यांनी पाठपुरावा केला.

मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी रोझरी शाळा ते डॉकयार्ड रोड स्टेशन पादचारी पुलाचे भूमिपूजन केले. बाजार व उद्याने समितीच्या अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका श्रीमती यामिनी जाधव, माजी नगरसेवक श्री. यशवंत जाधव,माजी नगरसेवक श्री. आशीष चेंबूरकर, माझगांव डॉकचे संचालक श्री. राकेश आनंद,श्री. संजीव शहा व मान्यवर उपस्थित होते.

मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी सांगितले की, स्थानिक नगरसेविका श्रीमती यामिनी जाधव यांनी या पादचारी पुलासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हितासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पुढाकार घेते याचे हे उत्तम उदाहरण आहे. बृहन्मुंबई महापालिका नागरिकांना आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते यासारख्या नागरी सेवा-सुविधा देतानाच नावीन्यपूर्ण प्रकल्प/उपक्रम देखील राबवित आहे, असे त्यांनी नमूद केले.

श्री. आशीष चेंबूरकर म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणतेही कर्तव्य बजावत असताना अगोदर नागरी हित पाहून कार्य करते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. माजी नगरसेवक श्री. यशवंत जाधव यांचेही समयोचित भाषण झाले.

महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते भरत पारकर व अर्जुन साटम यांच्या नावे चौकाचे नामकरण देखील करण्यात आले.

Post Bottom Ad