पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीसुयोगला भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 December 2016

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीसुयोगला भेट

नागपूर, दि. 15 : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सिव्हिल लाईन्स येथील पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. 


यावेळी शिबिरप्रमुख दिलीप जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन पर्यावरण मंत्री कदम यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कदम म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्राला प्रस्ताव पाठवून या नद्यांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी  उपाययोजना करण्यात येत आहेत. मोठ्या शहरांमधील वाढत्या वायू  प्रदूषणाची  समस्या सोडविण्यासाठी विविध वाहतूक सिग्नलवर प्रदूषण मापन यंत्र लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागरिकांकडून तक्रारी नोंदविण्यासाठी  शासनाकडून ॲप तयार करण्याच्या सूचनेचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच  राज्याच्या  उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरातील भांडेवाडी डंपिंग यार्ड येथील समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी  शासन स्तरावर विविध प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार राजन पारकर यांनी आभार मानले.

Post Bottom Ad