पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (एमएससीईआरटी) यांच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाच्या आधारित घेतली जाईल. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाच्या आधारित घेतली जाईल.
इयत्ता 5 वी, इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठी दिनांक 1 ते 31 डिसेंबर2016 पर्यंतचा कालावधी आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने शुल्क भरण्यासाठी 1डिसेंबर 2016 ते 2 जानेवारी 2017 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. चलन अपडेट करणे व प्रपत्र अ ची प्रिंट घेण्यासाठी दिनांक 1 डिसेंबर2016 ते 3 जानेवारी 2017 असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
विलंब शुल्कासह या परीक्षेसाठी आवेदनपत्रे दिनांक 1 ते 7जानेवारी 2017 पर्यंत भरता येणार आहेत. या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने शुल्क भरण्यासाठी दिनांक 3 ते 9 जानेवारी 2017 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. चलन अपडेट करणे व प्रपत्र अ ची प्रिंट घेण्यासाठी दिनांक 3 ते10 जानेवारी 2017 असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
तसेच अतिविलंब शुल्कासह या परीक्षेसाठी आवेदनपत्रेदिनांक 8 जानेवारी 2017 ते या परीक्षेपूर्वी 15 दिवस अगोदरपर्यंत भरता येतील. ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने शुल्क भरणे आणि चलन अपडेट करणे व प्रपत्र `अ` ची प्रिंट घेण्यासाठी 8जानेवारी 2017 ते या परीक्षेपूर्वी 15 दिवस असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :-
• School login साठी आपल्या शाळेचा UDISE code हाचPassword आहे. तो वापरुन लॉगिन करावे व Password बदलून पुन्हा लाँगिन करावे.
• शाळेने सर्वप्रथम शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरणे आवश्यक आहे. शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरुनConfirm केल्यानंतरच विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरता येणार आहेत.
• शुल्क भरण्याकरिता Online आणि Offline Payment असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. Offline Payment हा पर्याय निवडल्यास फक्त बँक ऑफ इंडियाच्या शाखेतच शुल्क जमा करता येईल.
• ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे फोटो स्कॅन करुन जतन करुन ठेवावेत.
• ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये लागू असेल तेथे 20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार/ प्रांत अधिकारी) यांचे प्रमाणपत्र तसेच भूमिहीन शेतमजूर असण्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र upload करणे अनिवार्य आहे.
• आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक भरणे अनिवार्य आहे.
• विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र प्रिंट करण्याची आवश्यकता नाही. परीक्षेची आवेदनपत्रे भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी (प्रपत्र अ),असल्यास प्रमाणपत्र (पालकांचे उत्पन्न 20 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, पालक भूमिहीन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र) गटशिक्षणाधिकारी/वॉर्ड ऑफीसर यांनी तपासणीकरिताonline उपलब्ध करुन देण्यात येतील.
• पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि विद्यानिकेतन (शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती) प्रवेश परीक्षा यासाठी एकच आवेदनपत्र आहे. त्यात विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना विकल्प देण्यात आला आहे.
• याबाबत सविस्तर माहिती व सूचनांसाठी परिषदेच्या www.puppss.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.