मेट्रो प्रकल्पासाठी वृक्ष छाटणीला भाजप वगळता सर्वपक्षीयांचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2016

मेट्रो प्रकल्पासाठी वृक्ष छाटणीला भाजप वगळता सर्वपक्षीयांचा विरोध

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई मेट्रो ३ प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची कापणी आणि पुनर्रोपण करण्याची परवानगी मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला द्यावी असा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये आणण्यात आले. झाडे कापण्याच्या २१ प्रस्तावापैकी ५ प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिला. मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही, परंतु, प्रशासन झाडांचे पुनर्रोपन कुठे करणार आणि ती जागा सदस्यांना कधी पाहायला मिळणार असा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी उपस्थित केला. प्रशासनाने प्रकल्पाविषयी असलेल्या संशयाचे निरसन केले तर प्रकल्पाला मंजुरी देण्याची ग्वाही दिली. या प्रस्तावाला भाजप वगळता शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी विरोध केल्याने आयुक्तांना सदर प्रस्ताव राखून ठेवावा लागला .

मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला मेट्रो ३ प्रकल्पासाठी मुंबईमधील झाडे तोडावी लागणार आहेत. झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता असते. यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये २१ प्रस्तावाद्वारे झाडे कापण्याची तसेच पुनर्रोपीत करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी प्रस्ताव क्र . १६ मध्ये के पश्चिम विभागातील डी एन नगर ते ओशिवरा नाला अंधेरी पश्चिम येथील नियोजित दहिसर पश्चिम ते डी एन नगर मुंबई मेट्रो लाईन दोन इ कॉरिडोरच्या विकासकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची कापणी, प्रस्ताव क्र २७ मध्ये ए विभागातील मेट्रो स्टेशन बॉक्स , कफ परेड स्टेशन , मुंबई ५ येथील मुंबई मेट्रो लाइन ३ प्रोजेक्टच्या बांधकामात येत असलेली झाडे कापणे व पुनर्रोपित करणे , प्रस्ताव क्र ३० मध्ये जी दक्षिण विभागातील सायन्स म्युझियम स्टेशन येथील मेट्रो स्टेशन बॉक्सच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची कापणी व पुनर्रोपण आणि प्रस्ताव कर. ३५ मध्ये जी दक्षिण विभागातील वरळी स्टेथन येथे मेट्रो स्टेशन बॉक्सच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटनी व पुनर्रोपण करणे,

 जी दक्षिण विभागातील मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सिध्दीविनायक स्टेशन येथे मेट्रो स्टेशन बॉक्सच्या बांधकामात अडथळा करणाऱ्या वृक्षांची कापणी व पुनर्रोपण करणे प्रस्ताव आज राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या राखून ठेवलेल्या प्रस्तावांनुसार एकूण ५२०६ झाडांची कापणी तसेच पुर्नरोपण करण्यात येणार होते. यामध्ये एकूण ११४८ झाडे कापण्याची मंजुरी मागण्यात आली होती, तर १४६५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार होते , मात्र ज्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे ती नेमकी जागा कोणती आहे हे जो पर्यंत वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांना दाखविण्यात येत नाही तोपर्यंत या प्रस्तावास मंजुरी देन्यात येऊ नये अशी मागणी भाजप वगळता शिवसेनसह सर्वपक्षिय सदस्यांनी केली. यावर बोलताना आयुक्त म्हणाले कि, सदर जागेची पाहणी वृक्ष प्राधिकरण समितीच्या तीन सदस्यांनी केल्यानंतरच हा प्रस्ताव समितीमध्ये मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांच्या या उत्तरावर सर्वपक्षीय सदस्यांनी आक्षेप घेत सर्व सदस्यांना जागा दाखविण्याची मागणी केली.

पालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने सुरुवातीपासून मेट्रो प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. मेट्रोला शिवसेनेने विरोध केल्यानंतर एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत कल्पाला विरोध न करण्याची विनंती केली होती त्याचबरोबर गिरगावातून एकही मराठी माणूस विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली होती. तरीही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून आज झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीमध्ये त्यानी कडाडून विरोध करत भाजपला शह दिल्याचीं चर्चा पालिका वर्तुळात आहे. 

Post Bottom Ad